Narvat zilla parishad primary school get teacher
Narvat zilla parishad primary school get teacher sakal
नांदेड

नांदेड : नारवट शाळेला मिळणार शिक्षक

सकाळ वृत्तसेवा

भोकर : शाळा सुरू होताच नारवट येथील कामचूकार शिक्षकांना कार्यालयीन कामासाठी तालुका शिक्षण विभागात ठेवण्यात आले आहे. परिणामी शाळेवर शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ‘नारवटची शाळा चालते शिक्षकाविना’ या आशयाची सविस्तर बातमी मंगळवारी ‘सकाळ’ मधुन प्रसिद्ध होताच जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घेऊन येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना तत्काळ अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. आता शिक्षकावर काय कार्यवाही होणार याकडे लक्ष लागून आहे.

तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख हा उतरत्या क्रमाने घसरतो आहे. खर तर तो आलेख चढता असावा अशी पालकांची इच्छा आहे. बऱ्याच शाळांना विद्यार्थी संख्या चांगली असूनही तीथे शिक्षकाची कमतरता आहे. पिपंळढव, डौर, बिलालनगर ऊर्दू शाळेत शिक्षकाची वाणवा आहे. काही शिक्षक कामचुकारपणा करून शाळेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

असाच काहिसा अजब प्रकार नारवट शाळेत झाल्याने त्यांची सविस्तर बातमी मंगळवारी ‘सकाळ’मधून प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर व प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी सवीता बेरगे यांनी तत्काळ भोकर येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी माधव वाघमारे यांच्याशी संपर्क साधून नारवट शाळेचा अहवाल तयार करून पाठवण्यात यावा अशा सुचना केल्या. वाघमारे यांनी मंगळवारी नारवट शाळेला भेट देऊन माहिती घेतली. लवकरच शाळेला शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

त्या शिक्षकावर काय कार्यवाही होणार?

नारवट येथील शाळेवर असलेल्या दोन शिक्षकांनी शासकीय सेवेत असताना दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली नाही. कामचुकारपणा करून मुलांना ज्ञानाचे धडे देण्यात दिरंगाई केली आहे. ग्रामस्थांनी सदरील प्रकरणी टोकाची भूमिका घेऊन शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला होता. शिक्षणविभागानी वेळीच सावध भुमिका घेऊन हस्तक्षेप केल्याने ग्रामस्थ काहिसे नरमले आहेत. येथील वादग्रस्त शिक्षकावर शिक्षण विभाग काय कार्यवाही करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

‘सकाळ’मधील बातमी प्रसिद्ध होताच मी नारवट येथील शाळेवर मंगळवारी भेट दिली आहे. येथे शिक्षक मिळेपर्यंत मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

- माधव वाघमारे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT