बालविवाह 
नांदेड

नांदेड : निवघा ग्रामपंचायतने रोखला बालविवाह

निवघा येथे एका मुलीचा विवाह ठरला, परंतू त्या मुलीच्या लग्नाच वय अवघे १३ वर्ष होते. लग्नाचे वय झाले नसल्याने एका समाजसेवकाने ही बाब जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांच्याकडे लेखी कळविले.

बंडू माटाळकर

निवघाबाजार ( जिल्हा नांदेड ) : निवघा येथे एका मुलीचा विवाह ठरला, परंतू त्या मुलीच्या लग्नाच वय अवघे १३ वर्ष होते. लग्नाचे वय झाले नसल्याने एका समाजसेवकाने ही बाब जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांच्याकडे लेखी कळविले. त्यानुसार निवघा ग्रामपंचायतला तहसील कार्यालयाने कळविल्याने ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यानी हा बालविवाह रद्द केल्याने सर्वत्र ग्रामपंचायतचे कौतूक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवघा येथे ता. दोन मे रोजी एक बालविवाह संपन्न होणार होता. परंतू समाजात काही पडद्याआड काम करणारे समाजसेवक असतात. त्या समाजसेवकानी ही घटना जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात कळविली. जिल्हाधिकारी यानी तहसिलदार हदगांव याना लेखी पत्र देऊन ग्रामपंचायतला कळविली की, ता. दोन मे रोजी होणारा बालविवाह रद्द करण्यात यावा अन्यथा लग्न करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला.

ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यानी व व्यापारी मधूकर कदम यानी सदरील मुलीच्या वडीलाना व नातेवाईकाना अल्पवयीन मुलीच्या पालकांना जाऊन भेटले व त्यांना विश्वासात घेऊन सध्याच्या काळात अशा प्रकारे बालविवाह करणे अतिशय चुकीचे असून मुलीला अजून शिकवण्याची व तिला समंजसपणा येऊ देण्याची विनंती केली. व त्यांनी ताबडतोब आपल्या मुलीचा होणारा बालविवाह न करण्याचे मान्य केले.

यावेळी सरपंच शरद कदम, उपसरपंच श्याम कदम, ग्रामसेवक दिपक झरकर, मंडळाधिकारी श्रीमती कोल्हे, मधुकर कदम, शिवाजी देशमुख, अमोल कदम इत्यादी उपस्थित होते. खरचं आज आपल्या जिजाऊ, सावित्री रमाई च्या लेकींचा अशा प्रकारे बालविवाह करणे अतिशय चुकीचे व अक्षम्य अपराध आहे. पण अजूनही आपल्या ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे बालविवाह लावला जात असतो.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs ZIM : ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात? झिम्बाब्वेच्या अविश्वसनीय विजयाने 'ब' गटाचे समीकरण बदलले...

Mumbai Fire: मुंबईत लोअर परळ वर्कशॉपमध्ये आग, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

Valentine Week : व्हॉलिबॉलच्या मैदानावर फुललेलं प्रेम! कोच अभय आणि अंजली यांची रंजक प्रेमकहाणी; 37 वर्षांनंतरही 'रोझ डे'ने ताजा केला आठवणींचा सुगंध

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या मालाड पूर्वेत कुरार पोलिसांची मोठी कारवाई

Amravati Crime: वडिलांना मारहाण केल्याने सराईताचा खून; सहा अटकेत, एका विधिसंघर्षिताचा समावेश

SCROLL FOR NEXT