balaji kalyankar and dp sawant sakal
नांदेड

Nanded North Vidhansabha Election : शिवसेनेच्या विरोधात कोण मारणार बाजी?

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आगामी विधानसभेची निवडणुक लक्षवेधी राहणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आगामी विधानसभेची निवडणुक लक्षवेधी राहणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात आता कोण कोण राहणार?, याची आत्तापासूनच तयारी सुरू झाली आहे. विरोधकांनी त्यानुसार ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरूवात केली असून या मतदारसंघात कोण बाजी मारणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

नांदेड उत्तर मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आल्यावर पहिल्या आमदार होण्याचा मान डी. पी. सावंत यांना मिळाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यातून केलेल्या कामाची पावती त्यांना मिळाली.

तसेच त्यांना राज्यमंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. दुसऱ्या वेळेस २०१४ मध्ये देखील पुन्हा सावंत आमदार झाले. मात्र, त्यावेळी भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यामुळे त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले.

दोन वेळेस आमदार झालेल्या सावंत यांना २०१९ मध्ये मात्र पराभव पत्करावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे महापालिकेत विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक राहिलेले बालाजी कल्याणकर आमदार झाले. कल्याणकर यांना ६२ हजार ८८४ मते मिळाली. डी. पी. सावंत यांना ५० हजार ७७८ मते मिळाली.

यावेळी एमआयएमचे फेरोजलाला खान यांना ४१ हजार ८९२ तर वंचितचे मुकुंद चावरे यांना २६ हजार ५६९ मते मिळाली. एमआयएम आणि वंचितच्या उमेदवारांमध्ये मते विभागली गेल्यामुळे कल्याणकर यांचा विजय सुकर झाला. त्याचबरोबर या मतदारसंघात भाजपने बंडखोरी केली नसल्याने त्याचाही फायदा झाला.

गेल्या दीड वर्षात राज्यात सत्तेत बदल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्यापासून आमदार कल्याणकर सोबत होते. त्यानंतर खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर हे देखील शिंदेच्या गटात आले. त्यामुळे शिंदेच्या सेनेला बळ मिळाले.

आमदार कल्याणकर यांनी पावडेवाडीत उपजिल्हा रुग्णालय तसेच कृषी महाविद्यालयास मंजुरी आणली. महापालिकेतंर्गत विविध विकासकामांच्या योजना मंजूर करून आणल्या. रस्ते आणि पाणीपुरवठा व सिंचनातही लक्ष घातले. तर दुसरीकडे विरोधकही तेवढेच लक्ष ठेऊन असून आपआपल्या परीने मतदारसंघात प्रयत्न करत आहेत.

यंदा इच्छुकांची संख्या वाढणार

गेल्या निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेली मते लक्षणीय आणि विरोधकांना धडकी भरवणारी आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा बालाजी कल्याणकरच उमेदवार राहतील. कॉँग्रेसकडून पुन्हा डी. पी. सावंत यांचे तसेच सुजया चव्हाण, डॉ. मीनल पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांची नावे चर्चेत आहे. भाजपकडून मिलिंद देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून दत्ता पाटील कोकाटे यांचे तर राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाकडून पुन्हा डॉ. सुनील कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. निवडणुकीला अजून बराच अवधी असला तरी इच्छुकांच्या संख्येत मात्र वाढ होत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी एक चूक अन् Shreyas Iyer वर बंदी! CSK विरुद्धच्या सामन्यांनंतर IPL ची कडक कारवाई; २४ लाखांचा दंड

ट्रक चोरीला गेला... पोलिसांनाही सापडेना, पण कर्जाचे हप्ते सुरू... अखेर तरुणाने संपवले जीवन, आईची मागितली माफी

Latest Marathi News Live Update : सांगलीत हद्दपार गुंडाकडून रुग्णवाहिकेची तोडफोड

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला! आता सातारा जिल्ह्यातील 'या' भागातून सुसाट धावणार गाड्या; जयकुमार गोरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

SCROLL FOR NEXT