

Shreyas Iyer | Punjab Kings
Sakal
CSK vs PBKS Marathi News: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्सने इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. शुक्रवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्सने पराभूत केले.
या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) २१० धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले. यात कर्णधार श्रेयस अय्यरचाही मोठा वाटा राहिला आहे. मात्र असे असले तरी संघाकडून पहिल्या दोन सामन्यातच झालेल्या मोठ्या चूकीमुळे आता श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) बंदीची टांगती तलवार आहे.