file photo 
नांदेड

नांदेड : गृहकर्जासाठी पोलिसालाच एक लाखाचा गंडा, भाग्यनगर ठाण्यात गुन्हा 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : गृहकर्ज मिळवून देतो म्हणून चक्क एका पोलिसाला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिडीत पोलिसांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. पाच) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसालाच गंडा घातल्याने शहरात चर्चेला उधान आले आहे. 

बँकेतून ३५ लाखांचे कर्ज काढून देण्यासाठी नांदेड पोलिस दलात कार्यरत असलेले बालाजी शिरगिरे यांची पालम येथील एका भामट्याने ओळख पाडली. मी अनेकांना गृहकर्ज मंजूर करुन दिेले आहेत. तुम्हालाही पाहिजे असेल तर मी मिळवून देतो. शिरगिरे यांना आपल्या विश्वासात घेऊन ३५ लाखाचे गृहकर्जासाठी काही रक्कम भरावी लागते. त्यासाठी त्याने पोलिसाकडून दोन लाख ६९ हजार रुपये घेतले. मात्र खूप दिवस झाल्यानंतर कर्ज नाही व पैशाची परतफेडही नाही म्हणून श्री. शिरगिरे यांनी त्याला पैसे मागितले. आज- उद्या करत त्या भामट्याने एक लाख ६० हजार रुपये परत केले. मात्र एक लाख नऊ हजार रुपये अद्याप परत केले नाही. 

एटीएस शाखेत कार्यरत असलेले बालाजी शिरगिरे यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्कार दिली. त्या तक्रारीत ता. १६ जानेवारी २०२० पासून ते ता. १२ जून २०२० दरम्यान त्या भामट्याने त्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भाग्यनगर येथून 35 लाखांचे गृहकर्ज काढून देतो असे हमी दिली होती. तो भामटा पालम तालुक्यातील असल्याचे त्याने तक्रारीत नमुद केले. याप्रकरणी पोलिसांनी पालम तालुक्यातील या भामट्याविरुद्ध भाग्यनगर ठाण्यात फसवणुकीचा  गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT