Nanded Puri Nanded route six special trains start sakal
नांदेड

नांदेड - पुरी - नांदेड सहा विशेष रेल्वे धावणार

प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रवाशांची रहदारी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड - पुरी - नांदेड अशा सहा विशेष रेल्वे उन्हाळी हंगामामध्ये वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, उन्हाळा संपत आल्यानंतर जूनमध्ये हा निर्णय घेतल्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. नांदेड - पुरी रेल्वे (क्रमांक ०७५६५) ही रेल्वे ता. सहा, ता. १३ आणि ता. २० जूनला नांदेड येथून दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी सुटणार असून परतीच्या प्रवासात पुरी - नांदेड ही रेल्वे (क्रमांक ०७५६६) दर बुधवारी ता. आठ, ता. १५ आणि ता. २२ जून रोजी दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी सुटेल.

दोन्ही विशेष रेल्वे मुदखेड, धर्माबाद, बासर, निजाबाद, कामारेड्डी, मेडचल, सिकंदराबाद, काझीपेठ, वारंगल, महबूबाबाद, खम्मम, रायनापडू, एलुरु, राजमुंद्री, समलकोट, अनकापल्ली, दुववंडा, विशाखापट्टनम रोड, पलासा, बेरहामपूर, छत्रपूर, बालुगाव आणि खुर्दा रोडवर थांबतील. या रेल्वेला एसी, टू टियर, एसी थ्री टायर, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने कळविले असून, प्रवाशांनी या रेल्वेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

कुऱ्हाडीने मारहाण करून दात पाडला

नांदेड : सोमठाणा (ता. नायगाव) येथे साहेबराव देवीदास आलुरे (वय ४०) या शेतकऱ्याच्या शेतात सहा आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यानंतर आम्ही विकलेल्या प्लॉटच्या कागदावर सही का करत नाहीस म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर कुऱ्हाडीच्या तुंब्याने दोन्ही पायावर आणि हातावर मारून फॅक्चर केले तसेच त्यांचा दातही पाडला. मारहाण करून गंभीर दुखापत करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार अटकोरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT