file photo 
नांदेड

नांदेड : ७५ हजाराच्या देशी दारुसह सात लाखाचा ऐवज जप्त- उस्माननगर पोलिसांची कारवाई

गणेश ढेपे

मारतळा ( जिल्हा नांदेड) : उस्माननगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लाडका येथे ता. ३० डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमाारास अवैध मार्गाने चोरुन विक्रीस नेण्यात येणारी पाऊन लाखाची देशी दारु उस्माननगर पोलिसांनी केली जप्त.

उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस गस्त घालत होते. यावेळी ता. ३० डिसेंबर रोजी रात्री उस्माननगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बी. पी. थोरे यांना माहिती मिळाली की, धानोरा येथील श्यामसुंदर श्रीहरी जाधव हा त्याच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो जीपमधुन देशी दारुचे बॉक्स हळदा, काटकळंबा, चिखलकडे भूकमारी लाडका मार्गे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी जाऊन उस्माननगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाडका येथील टी पॉइंट येथे अंदाजे वेळ रात्री साडेअकरा वाजता भूकमारीकडून येणारी बोलेरो कार अडवून चौकशी केली. यावेळी जिपमध्ये देशी दारुचे ३० बॉक्स अंदाजे किंमत ७४ हजार ८८० रुपये व (एमएच 26- बीसी 7721) पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप असा एकूण सहा लाख ७४ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारुची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आली. सदर आरोपी श्यामसुंदर श्रीहरी जाधव राहणार धानोरा, तालुका कंधार यांच्यावर उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही ही सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बी. पी. थोरे, हवालदार श्री. मस्के,श्री. मुंडे, श्री. जाकुलवारसह चालक श्री. कदम यांच्या पथकाने केली. असी माहिती उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवराज जमदाडे यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

Latest Marathi News Live Update: महाबळेश्वर आणि तापोळा परिसराचा होणार भव्य कायापालट; केबल-स्टेड ब्रिज, बोगदे आणि 'नवीन महाबळेश्वर' प्रकल्पाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

SCROLL FOR NEXT