file photo
file photo 
नांदेड

नांदेड : निधी उपलब्धते अभावी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होईना

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शासन पातळीवरुन आवश्यक त्या मागणीच्या प्रमाणात जिल्ह्याला पुरेसा निधी प्राप्त होत नसल्याने जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित वेतन एक ते पाच तारखेच्या दरम्यान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन देखील मागील दोन ते तीन वर्षापासून दरमहा नियमित मिळेनासे झाले.

त्यामुळे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित वेतन व सेवानिवृत्ती शासकीय कर्मचारी यांना देखील सेवानिवृत्तीवेतन बहुतांशी वेळा एक ते दोन तारखेच्या दरम्यान त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. परंतु जिल्हा परिषद कर्मचारी यांना शासन दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी यांनी शासनाच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

जवळपास दोनशेवर योजना गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून राबविल्या जातात. परंतु ग्रामीण भागात कार्यरत जिल्हा परिषद कर्मचारी मग तो कार्यालयीन कामकाज करणारा असो अथवा क्षेत्रिय कामकाज करणार असो त्यांना दोन ते तीन वर्षापासून कधीच दर महिन्याच्या एक तारखेला वेतन दिले जात नाही असे संघटनेचे म्हणणे आहे. निवृत्तीवेतनधारक यांना सेवानिवृत्तीनंतर एक ते दीड लाखापर्यंत निवृत्तीनंतर मिळणारा आर्थिक लाभ देखील निधीअभावी दिले जात नाहीत. अलीकडेच उच्च न्यायालयाच्या एका निर्णयात सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ विलंबाने दिले तर संबंधित कर्मचाऱ्याला त्याला वेतनाच्या रक्कमेवर व्याज आकारुन देण्याचे निर्देश आहेत. मात्र अशी वेळ शासनावर येऊ नये असे जिल्हा परिषद कर्मचारी यांनी शासनाच्या मुख्य सचिवाकडे केलेल्या तक्रारीत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT