file photo 
नांदेड

नांदेड : शेवडीच्या शिवानंद वट्टमवार यांना वीज बिलात दोन लाख ३१ हजाराची सुट 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महावितरणच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महाकृषी ऊर्जा अभियाना अंतर्गत सुरु असलेल्या कृषिपंप थकबाकीतील विलंब आकार व व्याजाच्या माफीतून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत लोहा उपविभागातील शेतकरी शिवानंद गजाननराव वट्टमवार यांनी दोन लाख 52 हजार 820 रुपयांचा वीज बिल भरणा केला आहे. कृषी पंपाची थकबाकी कोरी करुन सन्माननीय कृषिपंप धारकाचा महावितरणचा बहुमानही त्यांनी प्राप्त केला आहे.

महावितरणच्या लोहा उपविभागा अंतर्गत येणाऱ्या शेवडी बा. येथील कृषीपंप धारक शेतकरी शिवानंद गजाननराव वट्टमवार यांच्या व कुटुंबियांच्या नावे चार वीज जोडणी असून या चारही कृषिपंपाची एकूण चार लाख 84 हजार पन्नास रुपयांची थकबाकी होती. महा कृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणांतर्गत निर्लेखना नंतर विलंब आकार व व्याजाच्या शंभर टक्के माफीच्या सवलतीच्या आधारे तब्बल दोन लाख 31 हजार 230 रुपयांची भरघोस सवलत त्यांना मिळाली. या संधीचा लाभ घेत त्यांनी दोन लाख 52 हजार 820 रुपयांचा वीज बिल भरणा केला.

लोहा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन दवंडे व लेखा अधिकारी कार्तिक जाधव यांनी महा कृषी ऊर्जा अभियानातील धोरणाची सविस्तर माहिती दिल्यानंतर हे धोरण कृषी पंप धारक शेतकऱ्यांसाठी किती लाभदायक आहे. याची प्रचिती श्री वट्टमवार यांना आली व त्यांनी एकरकमी थकबाकी भरून महावितरणचे सन्माननीय वीजग्राहक असल्याचा बहुमान प्राप्त केला.

महा कृषी धोरण हे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे वरदान असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले. या संधीचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. या महा कृषी ऊर्जा पर्वाची प्रचार व प्रसिद्धीसाठी कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण आणि त्यांची चमू परिश्रम घेत आहे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT