file photo 
नांदेड

नांदेड : दोषींवर कडक कारवाई करा पण निरपराध्यांना त्रास देवू नका; काँग्रेसची मागणी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : हल्ला- महल्ला मिरवणुकीच्या निमित्ताने गुरुद्वारा परिसरात जी काही घटना घडली आहे. ती निश्चितच निंदनीय आहे. समाजामध्ये अशांतता निर्माण करणार्‍या कोणत्याही समाजघटकाला पाठीशी घालू नका. परंतु पोलिसांकडून दोषींवर कडक कारवाई होत असतानाच निरापराधांना त्रास होवू नये याची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांकडे रविवारी (ता. चार) केली.

हल्ला- महल्ला उत्सवानिमित्त शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत जमावाने पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये काही पोलिस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली. यामध्ये जे मूळ गुन्हेगार आहेत, अशांवर कारवाई गरजेची आहे, असे सांगतानाच यामध्ये ज्यांचा सहभाग नाही, अशांवर कारवाई करण्यात येवू नये अशी मागणी शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांकडे केली. 

यावेळी गुरूद्वारा परिसरात झालेल्या एकूण घटनाक्रमावर पोलिस अधीक्षक व शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान नांदेड शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी व गुन्हेगारांवर आळा बसविण्यासाठी शीख बांधवांकडून सहकार्य अपेक्षित असल्याच्या भावना पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी व्यक्त केल्या.

या वेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार अमर राजूरकर व नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने शीख समाजाच्या भावना पोलिस प्रशासनापुढे व्यक्त केल्या व या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण सहकार्य करणार असल्याचे अभिवचन देण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये महापौर मोहिनी येवनकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि. प. चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, बाजार समितीचे संचालक विठ्ठल पाटील डक, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, दिनेश बाहेती, रंजितसिंघ कामठेकर, गुरुमितसिंघ तमाना, महेंद्रसिंघ लंगारी, अ‍ॅड. राजनसिंघ कदम्बा, करणसिंघ खालसा, सविंदरसिंघ, तेजपालसिंघ, जर्नेलसिंघ, अवतारसिंघ पहेरदार आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT