Nanded Thousand Schools Without Science Laboratories 
नांदेड

Nanded : एक हजारावर शाळा प्रयोगशाळाविना

जिल्ह्यात फक्त १०६ प्रयोगशाळा सुरू; विद्यार्थ्यांची वैज्ञानिकदृष्टी खुंटली

प्रमोद चौधरी

नांदेड : शालेय जीवनात पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजविण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये प्रयोगशाळा आहेत. परंतु, या प्रयोगशाळांना घरघर लागली असून, जिल्ह्यातील दोन हजार १९५ जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी एक हजार ४५३ शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत. तर ७४२ पैकी फक्त १०६ प्रयोगशाळा या सुरु आहेत. परिणामी शालेय विद्यार्थ्यांची वैज्ञानिकदृष्टी खुंटत आहे.

शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. खासगी शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिक्षक तसेच लोकसहभागातून काही शाळा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत अस्तित्व टिकवून ठेवले आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी जागृत करण्यासाठी खासगी शाळांच्या तुलनेमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रयोगशाळांची संख्या खूपच नगण्य आहे. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी जागरुक करण्यासाठी शिक्षकांना मर्यादा येत आहेत.

फक्त १०६ प्रयोगशाळा सुरु

जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन हजार १९५ शाळा आहेत. या शाळांमध्ये एक हजार १०८ विज्ञान शिक्षकांची संख्या आहे. फक्त नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र व गणित व विज्ञान पेटी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील फक्त ७४२ शाळांमध्ये प्रयोगशाळा असून, त्यापैकी फक्त १०६ प्रयोगशाळा सुरु आहेत. एक हजार ४५३ शाळांमध्ये प्रयोगशाळाच नाहीत. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थी प्रयोगशाळांपासून वंचित आहेत.

नांदेड जिल्ह्यातील तालुकानिहाय जि.प. शाळेची स्थिती

तालुका - एकूण शाळा - प्रयोगशाळा - सुरु असलेल्या प्रयोगशाळा

नांदेड १३३ ५७ ०७

अर्धापूर ६८ ३२ ५

मुदखेड ८२ ३४ ५

लोहा २०० ७४ ८

कंधार १८७ ४८ १०

मुखेड २२६ ८२ १२

देगलूर १४० ५४ ९

नायगाव १०७ ३९ ८

बिलोली ९० ३५ ११

धर्माबाद ५७ २२ ३

उमरी ८७ ३० १

भोकर १२४ ३५ ४

हदगाव १९६ ८५ ८

हिमायतनगर ११० १९ ४

किनवट २६४ ७४ ९

माहूर १२४ २२ २

एकूण २१९५ ७४२ १०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT