Ayushman Bharat Card esakal
नांदेड

Ayushman Card : आयुष्मान कार्ड मोहिमेत मराठवाडा विभागात नांदेड अव्‍वल!

राष्‍ट्रीय आणि राज्य आरोग्‍य हमी सोसायटीव्‍दारे बुधवारी (ता. २२) नांदेड जिल्ह्यांचा दूरदृष्‍य प्रणालीव्‍दारे आढावा घेण्‍यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - राष्‍ट्रीय आणि राज्य आरोग्‍य हमी सोसायटीव्‍दारे बुधवारी (ता. २२) नांदेड जिल्ह्यांचा दूरदृष्‍य प्रणालीव्‍दारे आढावा घेण्‍यात आला. यामध्‍ये मागील १५ दिवसांच्‍या कामामध्‍ये मराठवाडा विभागात नांदेड जिल्‍ह्याने उत्‍कृष्‍ट काम करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे.

पंतप्रधान जन आरोग्‍य योजना हा केंद्र शासनाचा कार्यक्रम असून त्याच धर्तीवर राज्‍य शासनाने सुध्‍दा महात्‍मा ज्‍योतिबा फुले जन आरोग्‍य योजना चालू केली आहे. यामध्‍ये पात्र लाभार्थींचे आयुष्‍यमान कार्ड तयार करुन वितरीत करण्‍यात येते.

या योजनेत एकूण एक हजार ३५६ रोगावरील उपचाराचा खर्च योजनेच्या अंगीकृत दवाखान्यात प्रती वर्ष प्रती कुटुंब पाच लाखापर्यंत मर्यादित असून तो लाभार्थ्यांना मोफत असणार आहे. या योजनेची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी आढावा बैठकीत दिली.

रेशन दुकानातील लाभार्थ्यांनी कार्ड काढले की नाही, याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहेत. तसेच कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी सर्व आशा सेविका यांना ग्रामीण भागातील सर्व लाभार्थींचे कार्ड काढण्‍याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यामध्‍ये एकुण एक हजार ३२६ आशांचे लॉगीन आयडी तयार झाले असून, त्‍यांच्‍याव्‍दारे कार्ड तयार केल्‍यास आशांना प्रती लाभार्थी पाच रुपये मिळणार असल्‍याचे त्यांनी सांगितले.

तसेच प्रत्‍येक ग्रामपंचायतीमध्‍ये सीएससी केंद्राव्‍दारे कार्ड काढण्‍याची सुविधा उपलब्‍ध असून, विकसीत भारत संकल्‍प यात्रा सध्‍या जिल्‍ह्यामध्‍ये असून, त्‍यातूनही पात्र लाभार्थींचे कार्ड तयार करण्‍यात येणार असल्‍याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ', 'वारणा' दूध विक्री दरात सहा रुपये वाढ; उद्यापासून अंमलबजावणी, म्हशीसाठी तीन, गायीसाठी दोन रुपये उत्पादकांना जादा मिळणार

वैभव सूर्यवंशीपासून हरमनप्रीत कौरपर्यंत... TIME Magazine च्या प्रतिष्ठित यादीत भारताच्या नऊ खेळाडूंना स्थान

IND vs NZ 1st Test Day 2 Live: भारताने मॅच फिरवली; जसप्रीत बुमराह, आकाश दीपची प्रभावी कामगिरी; हेन्री निकोल्सनंतर ग्लेन फिलिप्सचेही शतक, पण...

Gold and Silver : सोने-चांदीत घसरणीचा कल कायम ;दिवाळीनंतर खरेदीदारांना दिलासा; भाव आणखी कमी होण्याचा अंदाज

Vaibhav Sooryavanshi Match : वैभव सूर्यवंशी कल्ला करणार, तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली वन डे खेळणार; जाणून घ्या सामना कधी, कुठे, किती वाजता Live पाहता येणार

SCROLL FOR NEXT