Nanded Tree planting pits turned into garbage dumps
Nanded Tree planting pits turned into garbage dumps sakal
नांदेड

नांदेड : वृक्षलागवड करणारे खड्डे बनले कचराकुंडी

सकाळ वृत्तसेवा

भोकर : नागपूर येथील एका कंपनीस तालुक्यातील मुख्य रस्त्याच्या आणि शहरातील दुतर्फा भागात वृक्षलागवड करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शहरात नाममात्र लागवड करून देखावा उभा केला आहे. वेगळ्या जातींची झाडे लावण्यासाठी खड्डे खोदून ठेवले पण अद्याप लागवड केली नसल्याने त्या खड्ड्याचा वापर चक्क कचराकुंडी म्हणून केला जात आहे. जबाबदारी विसरून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.

शहरात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आजपर्यंत विविध लोकाभिमुख विकास कामांना गती दिली. राज्यात भोकर तालुका हे विकासाचे मॉडेल व्हावे अशी त्यांची धारणा आहे. त्या अनुषंगाने भविष्यातील अत्यावश्यक सेवा लक्षात घेऊन विकासाचा ‘रथ’ मार्गक्रमण करीत आहे. शहरात हरीत क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकले असून जागोजागी वृक्ष लागवड करण्याच्या सूचना संबंधीतांना दिल्या आहेत. राज्यात ईतर ठिकाणी ज्या कंपणीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून झाडे जिवंत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

अशा नागपूर येथील कंपणीला भोकर व परिसरात वृक्षलागवड करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागील वर्षी तालुक्यातील विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे वृक्षलागवडीचा बोजवारा उडाला आहे. लावण्यात आलेली बहुतांश झाडे वाळून गेली आहेत. कंपणी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांच्यात काही अटीवर करार करण्यात आला आहे. जवळपास करार संपत आला असून अटिची अद्याप पूतर्ता झाली नसल्याचे दिसून येत आहे. सदरील कंपणीच्या वेळकाढू धोरणावर वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

खड्ड्यात वृक्ष लागवड नाही

संबंधित कंपनीने शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा खड्डे खोदून वृक्षलागवड केली आहे. बहुतांश खड्ड्यात वृक्ष लागवड केली नाही. या बाबात शहरातील वृक्ष प्रेमींनी चौकशी केली असता. शिल्लक राहिलेल्या खड्यात या परिसरातील परिचीत असलेली व आॅक्सीजन देणारी गावठी झाडे लावण्यात येणार आहेत अशी माहिती दिली. वर्ष उलटून गेले तरी आजपर्यंत कोणत्याही जातीची झाडे शिल्लक राहिलेल्या खड्यात लावण्यात आली नाहीत. रस्त्यालगत खड्डे खोदल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रिकामे खड्डे असल्याने नागरिकांनी त्याचा चक्क ‘कचराकुंडी’ म्हणून वापर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT