Raman Gangakhedkar sakal
नांदेड

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक मेजवाणी

नांदेड वाघाळा महापालिका; डॉ. गंगाखेडकर यांना जीवन गौरव पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाचे ता. २९ एप्रिल ते ता. एक मे असे तीन दिवस नांदेडकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.महापालिकेच्या वतीने शनिवारी (ता. १६) दुपारी दोन वाजता हॉटेल विसावा येथे आयोजित पत्रकार परिषदेत महापौर जयश्री निलेश पावडे यांनी ही माहिती दिली.

यावेळी विधान परिषदेतील कॉँग्रेसचे गटनेते आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, उपमहापौर अब्दुल गफार, सभागृह नेते महेश कनकदंडे, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, गिरिष कदम, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, तालुकाध्यक्ष निलेश पावडे, प्रवक्ते मुन्तजीब, नगरसेविका मुळे, श्री. शंकतीर्थकर आदी उपस्थित होते.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे महापालिका वर्धापन दिन साजरा करता आला नाही. यंदा २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निवड समितीच्या शिफारशीनुसार पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती आमदार राजूरकर यांनी दिली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. सदरील कार्यक्रमासाठीचा निधी जिल्ह्यातील विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य यांच्याकडून स्थानिक विकास निधी अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी संमती दर्शवली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे शिफारस करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT