file photo
file photo 
नांदेड

ग्रामपंचायतनंतर नांदेड जिल्हा परिषदेची रणधुमाळी; बारड, पेठवडज आणि बोधडी येथे होणार पोटनिवडणूक

प्रमोद चौधरी

नांदेड ः बारड व पेठवडज गटातील जिल्हा परिषद सदस्यांचे जात प्रमाण अवैध ठरल्याने तसेच बोधडी येथील सदस्याचे निधन झाल्याने या जागा रिक्त आहेत. या तिनही जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी जाहिर केला आहे.


सदर पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारीला प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात बारड, पेठवडज व बोधडी अशा तीन जिल्हा परिषद गटातील रिक्त जागांसाठी निवडणुका होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आवाज घुमणार आहे.

मुदखेड तालुक्यातील बारड गटातून निवडून आलेल्या सविता वारकड तसेच कंधार तालुक्यातील पेठवडज गटातून विजयी झालेल्या शीलाताई उलगुलवाड या दोन महिला सदस्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. या दोन्ही गटातील सदस्यांना पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. याशिवाय बोधडी (ता.किनवट) जिल्हा परिषद गटातील सुनंदा दहिफळे यांचे निधन झाल्याने येथेही पोटनिवडणूक होत आहे. येत्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या सदस्यांना जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळणार आहे.

पंचायत समितीच्याही निवडणुका ः
दरम्यान, अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, नांदेड तालुक्यातील वाडी बु. व मुदखेड तालुक्यातील मुगट या तीन पंचायत समिती गणातील रिक्त जागांसाठी देखील निवडणुक होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT