Nanded Zilla Parishad sakal
नांदेड

Nanded : नांदेड जिल्हा परिषद ओबीसीसाठी राखीव

नांदेड जिल्हा परिषद अखेर आरक्षण जाहीर

सकाळ वत्तसेवा

नांदेड : मिनी मंत्रालय असलेल्या राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यात कार्यकाळ संपलेल्या आणि संपणाऱ्या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. मात्र, या निवडणुका कधी होणार? याकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

राज्य शासनाने शासकीय अधिसूचना ग्रामविकास विभागांतर्गत ता. ३० सप्टेंबर रोजी राज्यातील जिल्हा परिषदांसाठी सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या कालावधीच्या समाप्तीच्या दिवसाच्या लगत नंतरच्या दिवसांपासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिला अनुसूचित जाती (अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाचा राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या पदांची संख्या निर्दिष्ट केली आहे.

ग्रामविकास विभागाने कार्यकाळ संपलेल्या आणि संपणाऱ्या जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर केले आहे. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आता ओबीसी अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अडीच वर्षासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी प्रवर्गातून असणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमागील काही दिवसांपासून सरकारची उलथापालथ आणि न्याय प्रविष्टतेमुळे लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुका अजूनही कधी होणार? याबद्दल साशंकता आहे.

यातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व त्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. शासनाचे उपसचिव मनोज जाधव यांच्या स्वाक्षरीनुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. यासाठी आता सर्वच पक्षामधून मोर्चे बांधणी सुरु होणार आहे. मार्चमध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर याच प्रशासक म्हणून काम बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT