आसना नदीवर सांगवी येथील बंधारा 
नांदेड

नांदेडचा पाण्याचा प्रश्‍न सुटला...पण नियोजनाचे काय?

अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड शहराला गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प आणि आसना नदीवरील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने आणि विष्णुपुरी तसेच आसना नदीच्या बंधाऱ्यात पाणीसाठा केल्याने यंदाच्या उन्हाळ्यातील नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रश्‍न सुटला आहे. मात्र, असे असले तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरळीत होत नसल्याने काही ठिकाणी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

नांदेड शहराला गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पातून तसेच सांगवी येथील आसना नदीच्या बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. विष्णुपुरीतून नांदेड दक्षिण आणि उत्तर तसेच आसनेतून नांदेड उत्तर भागाला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी नांदेडसाठी आरक्षित करण्यात आले होते. त्यानुसार पिंपळगाव जवळ पुलाजवळील सांगवी बंधाऱ्यात इसापूर धरणाचे पाणी आले असून नांदेड शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

नांदेडसह इतर गावांनाही मदत
निमगाव येथील मुख्य कालव्याद्वारे पार्डी (म) नदीपात्रात ता. दहा मे रोजी रात्री बारा वाजता पाणी सोडण्या आले. हे पाणी सांगवी बंधाऱ्यात पोहचले आहे. इसापूर धरणाच्या पाण्यामुळे अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म), कामठा खुर्द, कामठा बुद्रुक, बामणी, शेलगाव खुर्द, शेलगाव बुद्रुक, सुगाव, सांगवी, मेंढला, निजामपुरवाडी, पिंपळगाव आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न मार्गी लागला आहे. त्याचबरोबर या भागातील बहुतांश गावांची सार्वजनिक विहिर ही नदीच्या काठावर आहे. पाणी आल्यामुळे त्या विहिरांनाही पाणी येणार असून उन्हाळ्यात नागरिकांच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न मिटणार आहे. तसेच या नदीच्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांची शेतीही अवलंबून आहे. त्यामुळे त्यांनाही मदत होणार आहे. 

सहा दलघमी पाणी आरक्षित
नांदेड शहराला पर्यायी व्यवस्था म्हणून इसापूर येथील पैनगंगा प्रकल्पात २०२० - २१ साठी सहा दलघमी पाणी जिल्हाधिकारी यांनी आरक्षित केले आहे. त्यापैकी पहिल्या पाळीमध्ये दोन दलघमी पाणी आसना नदीवरील सांगवी येथील बंधाऱ्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या नांदेड - उत्तर भागासाठी दोन दलघमीपैकी ०.९० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे.

नांदेडला दोन दिवसाआड पाणीपुरवठा
नांदेड महापालिकेच्या वतीने दोन दिवसांआड सध्या पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पातील उपलब्ध पाणी व सांगवी बंधारा येथील पर्यायी योजनेचे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा कोरोना महामारीच्या काळात सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. नागरिकांनीदेखील पाण्याचा अपव्यय करू न करता काटकसरीने पाणी वापरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT