file photo 
नांदेड

एनडीसीसी बँक निवडणूक : खासदार चिखलीकर, आष्टीकरांसह तीन उमेदवारी अर्ज दाखल

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी (ता. दोन) आपले नामनिर्देशनपत्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे दाखल केले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ता. 26 फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु ता. 27 फेब्रुवारी ते एक मार्च हे तीन दिवस सलग सुट्ट्यांचे दिवस आल्याने इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकले नाही. सलग सुट्ट्यांचा कालावधी संपताच मंगळवार (ता. दोन) मार्च रोजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारी अर्जाचे सूचक साहेबराव काळे तर अनुमोदक दिनाजी सोनवळे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नामनिर्देशनपत्राचे सूचक प्रभाकर देशमुख हे असून अनुमोदक मारोतराव सोनाळे आहेत तर जि. प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारी अर्जाचे सूचक शंकराव नाईक हे असून या अर्जाला सुभाष देशमुख यांनी अनुमोदन दिले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची ता. पाच मार्च ही अंतिम तारीख आहे. ता. 26 फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारखेनंतर केवळ मंगळवार (ता. दोन) मार्च रोजी तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. पहिल्याच दिवशी दिनकर दहिफळे, राजेंद्र केशवे, विजय सोनवणे व राजेश पावडे यांनी उमेदवारी अर्जाची खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : कॅनडामध्ये विमान अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT