तामसा : नाव्हा (ता. हदगाव) सारख्या दुर्गम भागातील भूमिपुत्र असलेले नितीन पुंडलिक नरवाडे यास स्पेनमधील विद्यापीठाने पीएच.डी. बहाल केली आहे. कॅन्सरवर त्यांनी संशोधन केले. नितीनचे प्राथमिक शिक्षण गावात तर दहावीचे शिक्षण तामसा येथे झाले.
नांदेड विद्यापीठातून बायोफार्मेटिक्स विषयातून सुवर्णपदकासह पदवी संपादन केल्यानंतर त्याने सावित्रीबाई फुले विद्यापीठातून डॉ. अभिजीत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात बायोफार्मेटिक्स विषयात एमएस्सी पूर्ण केले.
तिथेच डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या फेलोशिपची तो मानकरी ठरला. स्वतः मधील गुणवत्ता सिद्ध करताना पुढील शिक्षणावरील महागडा खर्च सहन करण्यासमोर घरची हालाखीची परिस्थिती अडचणीची ठरत होती.
शिक्षण थांबवत त्याने पुण्यातच राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र येथे नोकरी मिळवली. यानंतर त्याने मकाऊ या देशात प्रा. एडविन यांच्या मार्गदर्शनात हेल्थ सायन्स विषयात एका वर्षाचे संशोधन केले. परदेशात जाऊन पीएच.डी करण्यासाठी युरोपियन युनियनच्या माध्यमातून प्रतिष्ठित मेरी क्युरी फेलोशिपचा तो मानकरी ठरला.
यानंतर स्पेनमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सच्या प्रा. अंजला नियतो यांच्या मार्गदर्शनात त्यांचे कॅन्सरवर पीएच.डीचे संशोधन सुरू झाले. दरम्यानच्या काळात आयर्लंड, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया येथे त्याने कॅन्सरवरील शोधनिबंध सादर केले. त्याचा एक शोध निबंध जगप्रसिद्ध नेचर कॅन्सर जर्नलमध्येही प्रसिद्ध झाला. या प्रवासात त्याला आई-वडील, भाऊ-बहिणी यांची भक्कम साथ मिळाली. नुकतीच त्यास डॉक्टरेट पदवी स्पेनमध्ये प्रदान करण्यात आली.
खेडेगावातील सामान्य विद्यार्थी असामान्य कामगिरी जिद्द, चिकाटी, संयमाच्या जोरावर करू शकतो हे डॉ. नितीन नरवाडे याने सिद्ध केले आहे.
- डॉ. संदीप कारंजकर, नाव्हा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.