

Just Meters from Home, Couple Dies in Horrific Tempo Accident
sakal
सांगोला : आठवड्याचा बाजार करून दुचाकीवरून घरी परतताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास सांगोला- पंढरपूर रस्त्यावरील देशमुख वस्ती जवळील वळणावर घडली. या अपघातात रामचंद्र पांडुरंग बनसोडे (वय ६०) व लक्ष्मी रामचंद्र बनसोडे (वय ५५, दोघे रा. बामणी, ता. सांगोला) यांचा मृत्यू झाला.