Nanded  sakal
नांदेड

Nanded Loksabha Constituency : नांदेडमध्ये प्रचाराला उरले अवघे सहा दिवस

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असून आता अवघे सहा दिवस प्रचाराला शिल्लक राहिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असून आता अवघे सहा दिवस प्रचाराला शिल्लक राहिले आहेत. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार झडत आहेत. आता सहा दिवसात अनेक दिग्गज नेते नांदेडची मैदाने गाजविणार आहेत.

त्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक जोरदार तयारीला लागले आहेत. नेत्यांच्या तोफा धडाडणार असल्याने नांदेडकर जनतेमध्येही उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या ता. २६ एप्रिल रोजी नांदेड लोकसभेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीत एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत.

त्यात कॉँग्रेसने माजी आमदार वसंत चव्हाण, भाजपने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर तर वंचित बहुजन आघाडीने ॲड. अविनाश भोसीकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे ही निवडणुक तिरंगी होत असल्याचे चित्र आहे. भाजपने गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी (ता. २०) होणाऱ्या सभेची जोरदार तयारी सुरू केली आहे.

तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची शुक्रवारी (ता. १९) सभा होत आहे. कॉँग्रेसचे खासदार व भीमशक्तीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत हांडोरे यांची शुक्रवारी (ता. १९) सभा होत आहे. त्याचबरोबर केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची रविवारी (ता. २१) मुखेडला होणार आहे. मंगळवारी (ता. २३) नांदेड शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा रोड शो होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

Copper Investment : तांबे म्हणजे भविष्यातील ‘सोने’?

SCROLL FOR NEXT