private travels business
private travels business sakal
नांदेड

खासगी ट्रॅव्हल्सला प्रवाशी वैतागले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः नांदेडहून पुण्याला प्रवाशी घेऊन जाणारी खासगी स्लीपर कोट ट्रॅव्हल्स आठशे रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होते. परंतु त्याच ट्रॅव्हल्सने पुण्याहून नांदेडकडे परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांना मात्र दोन हजार रुपयापर्यंतची रक्कम मोजावे लागत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या या मनमानी तिकिट दरवाढीकडे कोण लक्ष देणार? कारवाई कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे सध्या दिवाळीचा सण जवळ आला आहे. गाव सोडून कामाच्या शोधात पुण्यामुंबईत कष्ट करुन पोट भरणारे हजारो कष्टकरी मजूर, कामगार आणि विद्यार्थी दिवाळीच्या सणाला आपल्या गावी परत येतात. त्यांना रेल्वेचे आरक्षण देखील करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणे, हाच एकमेव पर्याय असतो. त्या प्रवाशांची गरज आणि निकड लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्स चालक मनमानी प्रवासी भाडे आकारुन एक प्रकारे प्रवाशांची लुटच करत आहेत.

सध्या कोरोनामुळे प्रवाशांना जागा आरक्षित केल्याशिवाय रेल्वेत प्रवेश करता येत नाही. त्यामुळे गावी येणाऱ्या प्रवाशांसमोर खासगी ट्रॅव्हल्स हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. वर्षभर कष्ट करुन जमवलेल्या पैशातील जवळपास अर्धी रक्कम तर गावी येताना आणि जाताना प्रवासावरच खर्च होत आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होत असलेली प्रवाशांची कोंडी बघता अनेक कष्टकऱ्यांची दिवाळीत गावी येण्याची इच्छा असताना देखील त्यांना तिकिट दरवाढीमुळे दिवाळीत घरी येण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागत आहे.

सर्वाधिक खासगी ट्रॅव्हल्स नांदेड ते पुणे या मार्गावर धावतात. त्या पाठोपाठ मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर या मार्गावर आहेत. परंतु सर्वात जास्त तिकिट दर आकारला जातो तो पुण्याहून नांदेडकडे येण्यासाठी. या उलट एसटी महामंडळाच्या शिवशाही दोन बाय दोन एसी बससाठी केवळ ९१५ रुपये आकारले जातात. तर परिवर्तन आॅडनरी नॉन एसी बससाठी सहाशे रुपये तर या उलट खासगी स्लीपर सिटर नॉन एसी व एसी दोन बाय एक साठी ८१५ रुपये असे तिकट दर आहेत. या विरुद्ध खासगी ट्रॅव्हल्सच्या एसी व नॉन एसी स्लीपरसाठी एक ते दीड हजार रुपयापासून ते दोन हजार रुपये तिकिट दर आकारला जात आहे. एखाद्या दलालामार्फत तिकीट घेतल्यास हेच तिकीट अडीच हजार रुपयापर्यंत विकले जाते. त्यामुळे ऐन दिवाळीच्या उत्सवात खासगी बसच्या तिकिट दरवाढीला आवर घातली पाहिजे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT