file photo
file photo 
नांदेड

पेट्रोलचा भडका : देशात पेट्रोलचे दर नांदेडात सर्वाधिक; पेट्रोल ९९ रुपये ८७ पैसे प्रती लिटर

प्रल्हाद कांबळे/ गणेश पांडे

नांदेड ः मागील काही दिवसांपासून देशभर सर्वसामान्य नागरिक व शेतकरी जिवनावश्यक वस्तुंच्या महागाईच्या आगीत होरपळत आहेत. त्यात पेट्रोलच्या महागाईने तडका दिला आहे. देशात सर्वाधीक महागडे पेट्रोल सध्या नांदेड व परभणी जिल्ह्यात दिसून येत आहेत. नांदेडमध्ये पावर पेट्रोलचा दर प्रती लिटर ९९ रुपये ८७ पैसे तर साधे पेट्रोल ९६ रुपये ४४ पैसे. तर तिकडे परभणीतही पेट्रोलचा भडका उडला असून पावर पेट्रोल ९९ रुपये २७ पैसे तर साधे पेट्रोल ९६ रुपये ९२ पैसे तसेच हिंगोलीत पावर पेट्रोल ९८ रुपये आठ पैसे तर साधे पेट्रोल ९५ रुपये २५ पैसे असल्याते असल्याचे सांगण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधीक महागडे पेट्रोल धर्माबाद तालुक्यात आहे. शहरातही पेट्रोलच्या भावाने प्रचंड उसळी घेतली आहे. वाढत्या पेट्रोल भाववाढीच्या विरोधात महाआघाडीतील सर्वच पक्षांनी नुकतेच आंदोलन केले. मात्र केंद्र सरकारवर त्याचा काही परिणाम पडला नाही. या पेट्रोल महागाईमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अनेकांनी तर सायकल वापर करणे पसंद केले आहे. 

परभणी जिल्ह्यात गुरुवारी (ता. ११) साध्या पेट्रोलचा दर ९६ रुपये ९२ पैसे व पॉवर पेट्रोलचा दर ९९ रुपये २७ पैसे प्रती लिटर इतका होता. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य वाहनचालक मात्र प्रचंड हैराण झाले आहेत. पेट्रोल दरवाढीचा सर्वाधिक फटका परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत. राज्यात नव्हे संपूर्ण देशात पेट्रोल व डिझेल करिता परभणी जिल्हावासियांना सर्वाधिक दर मोजावे लागत आले आहेत. 

परभणी शहरासह जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या पेट्रोलपंप चालकांना मनमाड, सोलापूर, वर्धा व नागपूर येथील डेपोंमधून इंधन टँकरद्वारे आणावे लागते. त्याकरिता वाहतुकीवर जादा पैसे मोजावे लागतात. पेट्रोलची दरवाढ त्यामुळेच नागरिकांच्या खिश्यास फटका देणारा विषय ठरु लागला आहे. गुरुवारी (ता. ११) इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीत दर अधिक असल्याचे दिसून आले. साधे पेट्रोल व पॉवर पेट्रोलमध्ये जवळपास अडीच रुपयांचा फरक आहे. मात्र, साधे पेट्रोलही ९६ रुपये ९२ पैसे इतके झाल्याने वाहनधारक अक्षरशः हैराण झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT