plastic rice plastic rice
नांदेड

नांदेडात शालेय पोषण आहारात आढळले प्लॉस्टिकयुक्त तांदूळ

हिमायतनगर तालुक्यातील टेंभी येथे शालेय पोषण आहारात प्लॉस्टिकयुक्त तांदूळ आढळून आले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून चौकशाची मागणी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिमायतनगर (नांदेड): तालुक्यातील टेंभी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लॉस्टिक मिश्रित तांदुळ आढळून आले आहेत. ही बाब गुरुवारी (ता. २९) सकाळी उघडकीस आली असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन तांदळाची पाहणी केली आहे. सदर तांदुळाचे वाटप करू नये आणि पाल्यांच्या जीवनाशी चाललेला खेळ थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षणपद्धती चालू आहे. या बरोबरच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू आहे. कोरोना काळाच्या अगोदर शाळेतच भात शिजवून वाटप करण्यात येत होता. आता शालेय पोषण आहार घरपोच देण्याचे काम चालू आहे. (plastic rice found in nanded zp school)

गुरुवारी टेंभी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून तांदुळाचे वाटप करण्यात आले. या तांदळात प्लॉस्टिकचे मिक्स तांदुळ आढळून आले. ही बाब गावात कळाल्यावर पालकांनी शाळेत धाव घेऊन चौकशी केली. काही पालकांनी सदरचे तांदुळ चावून बघितले असता ते चावत नव्हते. फक्त दाताखाली चपटे होत असल्याचे दिसून आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच पुन्हा दुसरा प्रयोग म्हणून गावकऱ्यांनी तेच तांदुळ जाळले असता ते सरपणासारखे जळत असल्याचे गावकऱ्यांनी सांगीतले. याबाबत चौकशी करण्याची मागणी सरपंच यांचे पती कानबा पोपलवार, दिगंबर मुतनेपवाड, अर्जुन आलेवाड, दिपक भगत, प्रशांत पवार, रवी विलास पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत प्रभारी गटशिक्षण अधिकारी वानोळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता ते म्हणाले की, पोषण आहारात प्लॉस्टिकयुक्त तांदुळ आढळणे ही बाब गंभीर आहे. या सर्व बाबींची चौकशी करून वरिष्ठांकडे माहिती व ते तांदुळ पाठवून संबंधितावर जिल्हा शिक्षण अधिकारी दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Pune Airport: पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलसाठी ऑगस्टची प्रतीक्षा: सुरक्षा उपकरणे उपलब्ध नाहीत, ५०० प्रवाशांच्या बसण्याची सोय हाेणार!

Annasaheb Pathare : क्रीडा क्षेत्रावर शोककळा; ज्येष्ठ कुस्तीसंघटक अण्णासाहेब पठारे यांचे निधन

जीवनमान-जीवनभान : हृदयविकार आणि व्यायाम

Spinach Corn Toast Recipe: १० मिनिटांत झटपट तयार करा स्वादिष्ट पालक-कॉर्न टोस्ट; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय!

SCROLL FOR NEXT