pazar 1.jpg
pazar 1.jpg 
नांदेड

खाकी वर्दीला फुटला मायेचा पाझर...

विनोद आपटे

मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः जन्मापासूनच हात नाही. पाय नाहीत... मिळेल त्याठिकाणी राहाणे...अन्नाचा कण मिळविण्यासाठी घर-घर. तसेच जमिनीवर सरपटत फिरणे... राहण्यासाठी घर नाही... खाण्यासाठी अन्नाचा कण नाही...उन्ह, पाऊस, थंडी वाऱ्यात कापडी कपड्यांनी अधार दिलेल्या झोपडीत नरक यातना सहन करत आपले आयुष्य काढत... या अशा भयाण अवस्थेत जन्मदात्यासह समाजाने नाकारले...


मरण आज ना उद्या येईलच या आशेवर जीवन काढत...अशावेळी त्यांच्या या जन्माची करून कहाणी पाहून पोलिस कॉन्स्टेंबल रणजीत मुद्दीराज या कर्मचाऱ्याने त्यांच्या मदतीला धाऊन गेले. त्यांच्यावर मायेचा हात फिरवत त्याला हक्काचे टिन पत्राचे घर बांधून देऊन त्यांच्या जेवणाची व राहण्याची कायमची सोय केल्यामुळे मारोती दबडे, या अपंग व्यक्तीला आता अभाळही ठेणगे वाटू लागले आहे. तर रणजीत मुद्दीराज या पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या आदर्शत कार्याची सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

अस्थावाईकपणे विचारपूस
मुखेड तालुक्यातील चिंचगाव येथील रहिवासी व सध्या राज्य मार्गावर असलेल्या आड वळणाच्या मार्गावर असलेल्या प्रकाश नगर येथे राहत असलेल्या मारोती मोहनराव दबडे या तरूणाला जन्मापासूनच हात, पाय नसल्यामुळे याचे मरेपर्यंत पालन पोषण कोण करावे, असा वाद होत असल्यामुळे घरच्यांनी त्याला घराबाहेर मरणासाठी सोडून दिले. घरापासून आडमार्गावर असलेल्या प्रकाशनगर येथे एका कापडांनी तयार केलेल्या झोपडीत उन्ह, पाऊस, वाऱ्यात राहुन अन्न मागून मरणाचे दिवस जवळ करत होते. पण मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेंबल रणजित मुद्दीराज हे कोरोनाचे आजार वाढू नये यासाठी दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत यातुन वेळ काढून त्या अपंग असलेल्या व्यक्ती जवळ जाऊन त्याची अस्थावाईक पणे विचारपूस केली.


कोणी घरा समोरही येऊ देत नाहीत
त्याला राहण्यासाठी घर नाही, खायाला अन्न नाही. या कोरोनामुळे कोणी घरा समोरही येऊ देत नाहीत. खर्च करण्यासाठीही पैसे नाहीत. हे पाहून या पोलिस कर्मचाऱ्याने मारोती दबडे या अपंग व्यक्तीला स्वखर्चातुन मजबूत टिन पत्राचे हक्काचे घर बांधून देऊन त्याला नवीन कपडे व खाण्याची सोय करत खर्चासाठी पैसे दिल्यामुळे त्यांच्या आयुष्याची फरफट थांबली आहे. तर निराश्रीत व अपंगाला हक्काचे घर करून दिल्यामुळे पोलिस कर्मचारी रणजित मुद्दीराज यांचे सर्वच स्तरातुन मोठे कौतुक होत आहे.

आपण आपले सुखी आयुष्य जगत असताना समाजातील काही उपेक्षित घटकातील व निराश्रीत नागरिकांची आपआपल्या परीने मदत करून त्यांच्या आयुष्याला बळ देणे हे आपले कर्तव्य आहे. या निराश्रीत अपंग व्यक्तीची मदत करून मला समाधान वाटत असून अजूनही मी माझ्या परीने इतर अशा व्यक्तीची मदत करण्यास तयार असून यातून समाज सेवा घडते हेच माझ्यासाठी पुण्याचे काम होईल.
- रणजीत मुद्दीराज, मुक्रमाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT