Poultry farm 
नांदेड

पोल्ट्री उद्योगाला महागाईचा चटका; खाद्य महागले

खाद्य महागले : उत्पादन खर्च ३० टक्क्याने वाढला

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोंबड्यांच्या खाद्यात सतत वाढ होत असल्याने या व्यवसायावर संक्रांत आली आहे. पूर्वी एका कोंबडीच्या पालनासाठी ७० रुपये खर्च येत होता. आता तो शंभर रुपयावर गेल्याने कुक्कुटपालन आता फायद्याचा नव्हे तर तोट्याचा व्यवसाय झाला आहे. परिणामी, कुक्कुटपालक अडचणीत सापडले आहेत.

कोंबड्यांच्या खाद्यात मुख्यतः कनकी, मका, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरीचा समावेश होतो. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या खाद्याच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे कुक्कुटपालन करणारे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. उन्हाळ्यात पाण्याची मोठी समस्या असते. त्यामुळे कोंबड्यांना वाचवणे अधिकच जिकरीचे झाले आहे.यंदा उत्पादन अधिक असल्याने अंड्यांचे भाव घसरले आहेत. त्याचवेळी कोंबड्यांचे खाद्यदर वाढत आहेत. अशा स्थितीत अंड्यांचा व्यापार हा पोल्ट्री उत्पादकांसाठी तोट्याचा सौदा ठरत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत कोंबडीच्या खाद्याचे दर वाढले आहेत. जे मागील वर्षी १२ ते १३ रुपये किलो होते, ते आता २१ ते २२ रुपये किलोवर पोहोचले आहे. तसेच सोयाबीनचे दाणे ६२ रुपये किलो झाले आहेत. १२ रुपये किलो असलेली कनकी १५ रुपयांवर पोहोचली. पशु खाद्याप्रमाणेच कोंबड्यांचे खाद्यही महागल्याने व्यवसाय करताना अडचणी येत आहेत. कच्च्या मालाच्या किंमतीमुळे धान्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाची अवस्था दयनीय झाली आहे. तसे पाहिल्यास एक कोंबडी दररोज सुमारे ११० ग्रॅम धान्य खाते आणि १२० ते १५० दिवसांनी अंडी घालू लागते.

असे आहेत खाद्यांचे दर (रुपयांत प्रति किलो)

  • खाद्य मागील दर आताचे दर

    • सोयाबीन ४० ६५

    • मक्का १६ २१

    • कनकी १२ १५

    • शेंगदाणा ढेप १२ १६

''कोंबड्यांच्या खाद्यात विक्रमी भाववाढ झाल्याने कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी आता जोडधंदा राहिलेला नाही. कुक्कुटपालन करण्यासाठी लागणारे खेळते भांडवल वाढले असून नफा कमी झालेला आहे. तसेच व्यापाऱ्यांना उधारीत खाद्य देणे बंद केलेले आहे. या सर्व अडचणीत सर्वसामान्य शेतकरी सापडल्याने हा व्यवसाय त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे.''

- सुधीर दुद्दलवार, पोल्ट्री व्यावसायिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT