Pradhan Mantri Kisan Yojana KYC extension gives relief to farmers nanded sakal
नांदेड

खुशखबर! KYC साठी शेतकऱ्यांना मुदतवाढ

२२ मे पर्यंत असणार मुदत : अकराव्या हप्त्यासाठी राहणार अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेत सातत्याने बदल होत आहे. योजनेत अनियमितता दूर करणे आणि गरजू शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळावी, यासाठी सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. एक जानेवारी रोजी या योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. या नंतरच्या म्हणजेच अकराव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना ई - केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी ३१ मार्च ही अखेरची मुदत होती. मात्र, स्थानिक पातळीवरच्या शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने नियमात बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनाही ई - केवायसी अनिवार्य राहणार असून २२ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार व पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावरील माहितीप्रमाणे ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ तर मिळणार आहेच. पण योजनेत नियमितता आणण्यासाठीही प्रशासनाकडून योग्य ती यंत्रणा राबविली जाणार आहे. पीएम किसान योजनेचा आता अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. वर्षाकाठी सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. योजनेचे हे सहावे वर्ष आहे. मात्र, या दरम्यानच्या काळात अपात्र नागरिकांनीही याचा लाभ घेतलेला आहे. त्यासाठी कर्मचारी, आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही, असे असताना लाखो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर आल्याने ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना येत होत्या अडचणी

ई-केवायसी बंधनकारक राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ता. ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती. आधार कार्ड, बॅंक पासबुक, मोबाईल नंबर जोडून ई-केवायसी करायची आहे. पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेतून मिळत असलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. परंतु, ई-केवायसी भरण्यासाठी असंख्य अडचणी येत असल्याने बहुसंख्य शेतकरी वंचित राहिले आहेत. त्याची दखल घेऊन ई-केवायची भरण्यासाठी ता. २२ मेपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT