नांदेड

नांदेड : कौठ्याच्या महसूल इमारतींत नागरिकांचे अतिक्रमण

महसूल प्रशासनाची उडाली तारांबळ : पोलिस बंदोबस्तात काढले अनेकांना बाहेर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अनेक महिन्यांपासून धुळखात पडलेल्या कौठा येथील महसूल विभागाच्या टोलेजंग इमारतींमध्ये शेकडो नागरिकांनी काही दिवसांपासून अतिक्रमण सुरु केले आहे. सोमवारी (ता.२१) ही माहिती मिळताच महसुल विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर नांदेड ग्रामीण पोलिसांच्या मदतीने इमारतींमध्ये अतिक्रमण केलेल्या काहींना बाहेर काढले. परंतु, अजूनही काहींनी इमारतीत बस्तान मांडलेले असून, आम्हाला शासकीय घरकुल मिळेपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

नांदेड महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानासाठी नवीन कौठा भागात महसूल विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलेजंग इमारती बांधून घेतल्या आहेत. बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्ष होत आहेत. मात्र, या इमारतींमध्ये कोणीच राहत नसल्याने गतवर्षी येथे कोविड सेंटरही सुरु करण्यात आले होते. यानंतर हे ठिकाण काही काळ दारुड्यांचा अड्डा बनले होते. एवढेच नाही तर या इमारतींमधील काही साहित्यावर चोरट्यांनी डल्लाही मारला होता. तसेच उपद्रवींनी साहित्याची तोडफोड करून नुकसान केले आहे.

अनेक महिन्यांपासून या इमारती बंद असल्याचे पाहून कौठा परिसरातील शेकडो नागरिकांनी मागील काही दिवसांपासून या इमारतींमध्ये अतिक्रमण सुरु केले. अनेकांनी आम्हाला घरकुल देण्यात यावे, अशी मागणी करत तेथे बस्तान मांडून संसारही सुरु केला. ही माहिती सोमवारी सकाळी महसूल प्रशासनाला मिळताच त्यांची तारांबळ उडाली. अखेर नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांची मदत घेत तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार संजीवनी मुपडे, मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी श्री. नागमवाड, तलाठी मनोज देवणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि कब्जा करणाऱ्यांना समज दिली आहे.

पोलिस बंदोबस्तात आत कब्जा मिळविलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढण्यात आले. यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली. तरी अजूनही आम्हाला घरकुल देण्यात यावे, अशी मागणी करत अनेकांनी आत बस्तान मांडले आहे. या रिकाम्या सदनिकांमध्ये या नागरिकांना कब्जा करण्यासाठी कोणी सांगितले. या नागरिकांना त्यांची स्वतःची घरे आहेत का?, त्यांना घरकुल मंजूर झाली आहेत का?, याची चौकशी पोलिस विभागाकडून करण्यात येत आहे. संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT