Nanded News sakal
नांदेड

Nanded News : तांदळाचे दर क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढले;उन्हाळी साळीचा उतारा कमी झाल्याचा परिणाम

उन्हाळी साळीचा उतारा कमी आल्याने मागील आठवड्यापासून तांदळाच्या दरात क्विंटलामागे ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यातच तूर, हरभरा दाळीचे दरही तेजीत असल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : उन्हाळी साळीचा उतारा कमी आल्याने मागील आठवड्यापासून तांदळाच्या दरात क्विंटलामागे ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यातच तूर, हरभरा दाळीचे दरही तेजीत असल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

नांदेड जिल्ह्यात शेजारील तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक यासोबतच चंद्रपूर येथून तांदूळ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतो. अल्पपावसाचा फटका इतर पिकांसोबतच साळीच्या पिकालाही बसला आहे. त्यामुळे नोव्हेंबर (२०२३) मध्ये तांदूळ दाखल होताच जुन्यासोबतच नव्याचेही दर वाढले होते. सुरुवातीपासूनच तांदळाचे दर तेजीत होते. खरीप हंगामातील तांदूळ चवीलाही उन्हाळी तांदळापेक्षा चांगला लागतो.

मागील आठवड्यापर्यंत शेजारील राज्यांमध्ये साळ काढण्यात आली असून, उतारा कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या तांदळाच्या दरात क्विंटलामागे ५०० रुपयांनी दरवाढ झाली आहे. तर, बासमती तांदळात क्विंटलामागे एक हजार रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यातच दाळींच्याही किमती वाढल्या आहेत. तूरदाळ १६ हजार ते १८ हजार रुपये क्विंटल, हरभरा दाळ ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये क्विंटल झाली आहे. याशिवाय गव्हामध्येही १०० ते १५० रुपये क्विंटलामागे दरवाढ झाली आहे. पुढील काही दिवस दर कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापारी कमलाकर बेंडे यांनी सांगितले.

असे आहेत दर (क्विंटलमध्ये)

  • कोलम : पूर्वी सहा हजार रुपये ः आता ६ हजार ५००

  • एचएमटी : पूर्वी ५ हजार ५०० रुपये ः आता ६ हजार

  • डीपीटी : पूर्वी ४ हजार रुपये ः आता ४ हजार ५००

  • बासमती : पूर्वी ९ हजार रुपये ः आता १० हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT