महापालिका नांदेड 
नांदेड

नांदेड महापालिकेकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांचे 54 कोटी रुपये थकले

गेल्या दीड ते दोन वर्षाच्या काळात नांदेड- वाघाळा महानगरपालिकेने विजेचे एक ही पुर्ण देयक दिलेले नाही. कोरोनाचा काळ पाहता गेल्या दोन वर्षात महावितरणने महापालिकेला सहकार्यच केलेले आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महावितरणने थकबाकी वसुली करिता आता महानगरपालिका व नगरपालिकांकडे असलेल्या पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या थकबाकी वसुली कडे मोर्चा वळवला आहे. वारंवार लेखी व तोंडी सुचना देवूनही नांदेड- वाघाळा महानगर पालिकेकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव आता कोणत्याही क्षणी पथदिवे व पाणपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई होवू शकते. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेकडे पाणीपुरवठा योजनांचे 45 कोटी 16 लाख तर पथदिव्यांच्या वीजपुरवठ्याचे आठ कोटी 90 लाख रुपये थकबाकी आहे.

गेल्या दीड ते दोन वर्षाच्या काळात नांदेड- वाघाळा महानगरपालिकेने विजेचे एक ही पुर्ण देयक दिलेले नाही. कोरोनाचा काळ पाहता गेल्या दोन वर्षात महावितरणने महापालिकेला सहकार्यच केलेले आहे. मागणी एवढे देयक न दिल्यामुळे थकबाकीचा डोंगर वाढतच चालला असून महावितरण आर्थिक गर्तेत सापडली आहे. महापालिकेस पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी भरण्याकरिता महावितरणने वारंवार पत्राद्वारे व प्रत्यक्ष संवाद साधत थकबाकी भरण्याबाबत सूचना दिली आहे.

हेही वाचा - युरोपिय मेडिसीन असोसिएशनने कोविशील्डला ग्रीन पास का दिला नाही याचं कारण सांगितलं आहे.

मात्र अद्याप थकित रकमेचा पुरेसा भरणा न केल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही कोणत्याही क्षणी करू असा इशारा महापालिकेला दिला आहे. महापालिकेकडे लघु दाब वर्गवारीतील पथदिव्यांचे 663 वीज कनेक्शन आहेत. या वीज जोडण्यांकडे आठ कोटी 90 लाख रुपये थकबाकी आहे. तर लघुदाब वर्गवारीतील पाणी पुरवठा योजनांचे 184 वीज कनेक्शन असून त्यांच्याकडे एक कोटी सहा लाख रुपयांची थकबाकी आहे. तर उच्च दाब वर्गवारीतील पाणीपुरवठ्याच्या 15 वीज कनेक्शन कडे 44 कोटी 10 लाख रुपये थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे थकबाकी वसुली करिता वीज पुरवठा खंडीत करण्या शिवाय महावितरण कडे पर्याय उरला नसल्यामुळे वीजपुरवठा खंडीत करण्याची कटू कारवाई महावितरणला करावी लागत आहे.

अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक वीज खरेदी करिता थकबाकी वसुली होणे अत्यावश्यक झाले असून सर्वच थकबाकीदार वीज ग्राहकांनी वीज देयके त्वरित भरुन महावितरणला सहकार्य करावे अन्यथा वीज पुरवठा खंडीत केल्याशिवाय महावितरणपुढे पर्याय असणार नाही असे आवाहनही महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT