अनप्रोस जाधव 
नांदेड

जिद्दीला सलाम : किनवटचा अनप्रोस 'इमली 'त झळकला; शुभेच्छांचा वर्षाव

शेतकरी असलेल्या जयसिंग जाधव यांना दोन मुले पदवीधर असून तिघेही स्वतः च्या शेतात काम करुन उपजीविका करीत होते. महाविद्यालयात स्नेह संमेलनात अनेक कला सादर करणाऱ्या अनप्रोस याचे शेतात मन लागत नव्हते.

माधव शेंद्रे

मांडवी ( जिल्हा नांदेड ) : किनवट परिसरातील डोंगराच्या कपारीत वसलेल्या रायपूर तांडा ( ता. किनवट) या गावचा युवक अनप्रोस जयसिंग जाधव हा स्टार टी. व्ही वरील इमली या सिरीयलमध्ये काम करीत असल्यामुळे परिसरात त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याला लहानपणापासून आपण काही तरी वेगळ करायच अस मनात ठाम करुन जिद्द व कसोटीला उतरुन अखेर त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केले.

शेतकरी असलेल्या जयसिंग जाधव यांना दोन मुले पदवीधर असून तिघेही स्वतः च्या शेतात काम करुन उपजीविका करीत होते. महाविद्यालयात स्नेह संमेलनात अनेक कला सादर करणाऱ्या अनप्रोस याचे शेतात मन लागत नव्हते. त्यांनी वडिलास आपण तिघे जण शेतात राबण्यापेक्षा मी शहरात जाऊन काम करतो तुम्ही दोघे शेती सांभाळू शकता असे म्हणून मुंबई गाठली.

हेही वाचा - पुण्यात दरदिवशी हजार ते बाराशे इंजेक्शनची मागणी असताना, दोन दिवस पुरेल इतका साठा ‘एक्सपायर्ड’

काही दिवस खासगी कंपनीत काम केल्यानंतर त्यांना टी. व्ही. सिरीयलमधील कला सेट उभारणीत काम मिळाले. तेथे चांगल्या प्रकारे काम करीत असताना त्याच्यामधील कला गुण दिग्दर्शकाच्या लक्षात आल्याने त्याला प्रथम छोटे मोठे रोल देण्यात आले. त्यानंतर आजमितीस स्टार प्लस या टी. व्ही. सिरीयलवर सुरु असलेली प्रसिद्ध मालिका 'इमली 'यात त्यांनी भूमिका केली आहे.

खेड्यात सुद्धा कलाकार आहेत त्यांना योग्य दिशा मिळाल्यास ते सुद्धा यशस्वी होऊ शकतात हे या युवकाने सिद्ध केले आहे. याच परिसरातील शाहीर नागोराव, शाहीर दौलत, शाहीर जलपत यांनी मागील दशके गाजविली आहेत. कुठलेही राजकीय व सांस्कृतिक पाठबळ नसताना सुद्धा खेड्यात राहणारा युवकाने आपल्या जिद्दीच्या जोरावर यश मिळविल्याबद्धल परिसरात त्याचे अभिनंदन होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT