नांदेड

संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? तातडीने अटक करा

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : देशात कोरोना पसरला असताना सरकारने कोणताही मौर्चा, आंदोलन, सभा असे कार्यक्रम घेण्यास बंदी घातली होती. मात्र, या काळात खासदार संभाजीराजे यांनी न्यायालयाने असंविधानिक ठरवलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात नांदेडमध्ये शुक्रवारी मोर्चा काढला. संभाजीराजे यांनी हे गुन्हेगारी कृत्य केले. तेव्हा त्यांना अटक करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी नांदेडमध्ये होते. काढलेल्या मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी झाले होते. हा मोर्चा काढून संभाजी राजे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले. उच्च न्यायालयाने कोरोना काळात मोर्चे काढू नये, असे म्हटले आहे. तरीही त्यांनी मोर्चा काढला. ते कायद्यापेक्षा मोठे आहेत का? तेव्हा संभाजीराजे यांना अटक करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर नागरिक निदर्शने करतात त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. त्यांना पंधरा पंधरा दिवस तुरुंगात ठेवले जाते. संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षकांना याबाबत निर्देश द्यायला हवेत. मोर्चा काढू द्यायल नको होता. मात्र, तसे झाले नाही. मोर्चाला झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत अन्यथा पुढील परिस्थितीला ते जबाबदार राहतील, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे.

तातडीने त्यांच्या मुसक्या दावा

संभाजीराजे यांनी यापूर्वी सुद्धा नक्षलवाद्यांच्या संदर्भाने मराठा आरक्षणाच्या समर्थनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. त्या अनुशंगाने सुद्धा चौकशी होणे फार गरजेचे आहे. तातडीने त्यांच्या मुसक्या दावा, त्यांना अटक करून कारवाई करा, असेही वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT