Shivajirao Shinde said that the state should implement the changes made by the central government in the interest of farmers 
नांदेड

केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी हिताच्या बदलांची राज्याने अंमलबजावणी करावी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीतील समस्या व अडचणींबाबत विचार विनिमय करण्यासाठी शेतकरी संघटनेची महत्त्वाची बैठक नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी साखर कारखान्यांनी अंतिम दर व पहिली उचल जाहीर करावी, शासनाने कपाशीच्या प्रतिबंधित वाणांना परवानगी द्यावी, शेतजमिनीच्या मूल्यांकनाच्या अर्ध्या किंमतीचे शेतकऱ्यांना कर्ज द्यावे तसेच केंद्राने शेतकरी हितासाठी बदल केलेल्या कायद्याची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी इत्यादी विषयांवर सर्व कार्यकर्त्यांचे एकमत झाले, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली.

सोयाबीन व कापूस पीक काढणीच्या टप्प्यातच परतीच्या पावसाने दगा दिला व शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक हिरावून नेले, त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळणे आवश्यक आहे. शिवाय पीकविमा कंपन्यांच्या फसवेगिरीवर सरकारने अंकुश ठेवून शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात विमा मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे अभिवचनही शिवाजीराव शिंदे यांनी या बैठकीत दिले.

संघर्ष केल्याशिवाय शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही. हे सर्वविदित आहेच. त्यामुळे या एका विषयावर सर्वांचे एकमत झाले. साखर कारखाने सुद्धा उसाचा अंतिम दर व पहिली उचल जाहीर न करताच गळीत हंगामाला सुरुवात करत आहेत. तसेच नव्याने सुरु होणारे खाजगी साखर कारखानेसुद्धा पहिली उचल किती देणार हे जाहीर न करता ऊस तोड करत आहेत. दिवाळी सण तोंडावर आला असतानाच शेतकऱ्यांकडे जो माल आहे तो विक्रीसाठी नेऊन दिवाळी सण साजरा करण्यासाठी मागेल त्या किंमतीत देत आहेत. परंतु व्यापारी या मालाची पक्की पावती न देता, तेल कंपन्यांच्या फायद्याचे व्यवहार करत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा या विषयावर लक्ष घातले पाहिजे. शिवाय कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना वेळेत पतपुरवठा झाला, तर रब्बीच्या पेरणीसाठी याचा फायदा होईल, असे ठरावही यावेळी घेण्यात आले.

या बैठकीला शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, जिल्हाप्रमुख शिवाजीराव शिंदे, ऍड. धोंडीबा पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भानुदासराव धोंडगे, सदाशिवराव पा. काकांडीकर, महिला आघाडी शेतकरी संघटना प्रमुख जमनाबाई ढगे, शिवराज पाटील थडीसावळीकर, व्यंकटराव पाटील वडजे, रामराव पाटील कोंढेकर, विठ्ठलराव जाधव, किशनराव इळेगांवकर, भीमराव पा. शिंदे, किशन पाटील, माधवराव पा. शिंधीकर, उद्योजक आर.पी. कदम लिंबगावकर आदींसह अनेक तालुक्यांचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत पाटील हंगरगेकर व शिवाजीराव शिंदे यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. या बैठकीत शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करण्याची शेतकरी संघटनेने सर्वांनी शपथ घेतली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT