सचखंड गुरुद्वारा 
नांदेड

सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे शीख समाजांतर्गत कोविड रुग्णांसाठी विशेष मदत सेवाकेंद्र

शीख समाजात कोविड कोरोना संक्रमण पसरत असल्यामुळे गरीब व सामान्य कुटुंबापुढे उद्भवलेल्या अडचणीवर मार्गदर्शन देण्यासाठी व मदत करण्यासाठी गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड संस्थेतर्फे महाराजा रणजीतसिंघजी यात्री निवास परिसरात विशेष मार्गदर्शन केंद्र बुधवार (ता. २१) सकाळी नऊ वाजता सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे वरिष्ठ सहायक अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांनी दिली.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शीख समाजात कोविड कोरोना संक्रमण पसरत असल्यामुळे गरीब व सामान्य कुटुंबापुढे उद्भवलेल्या अडचणीवर मार्गदर्शन देण्यासाठी व मदत करण्यासाठी गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड संस्थेतर्फे महाराजा रणजीतसिंघजी यात्री निवास परिसरात विशेष मार्गदर्शन केंद्र बुधवार (ता. २१) सकाळी नऊ वाजता सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे वरिष्ठ सहायक अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांनी दिली.

नांदेडमध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. शीख समाजात देखील मृत्यूंचे प्रमाण वाढलेले आहेत. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि गरीब लोकांची होत असलेली हेलसांड थंबविण्याच्या उद्देश्याने गुरुद्वारा बोर्डाने पुढाकार घेतला आहे. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मनहास यांनी बोर्डाचे उपाध्यक्ष स. गुरिन्दरसिंघ बावा, सचिव स. रविंदर सिंघ बुंगाई, समन्वयक स. परमज्योतसिंघ चाहल, सदस्य भाई गोबिंदसिंघ लोंगोवाल, स. मनप्रीतसिंघ कुंजीवाले, स. गुरमीतसिंघ महाजन, स. रघुवीरसिंघ विर्क, व्यवस्थापन समिति सदस्य स. गुलाबसिंघ कंधारवाले, स. नौनिहालसिंघ जहागीरदार, स. देविंदरसिंघ मोटरावाले, अधीक्षक स. गुरविंदरसिंघ वाधवा, सहायक अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांच्या सहकार्याने महाराजा रणजीत सिंघजी यात्रिनिवास येथे विशेष कोविड सेवा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी (ता. २१) सकाळी नऊ वाजता पासून रात्री नऊवाजेपर्यंत, बारा तास हा सेवा केंद्र सुरु राहणार आहे. येथे कोरोना टेस्ट, सिटी स्कॅन, कोरोना उपचार औषधी, बेडची उपलब्धता इत्यादी विषयी मार्गदर्शन व मदत उपलब्ध राहील. समाजातील गरीब व गरजूसाठी निः शुल्क सिटी स्कॅन सेवा देखील बोर्डातर्फे देण्यात येणार आहे. तेव्हा शीख समाजातील रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

AI Superintelligence Race: AI माणसांना संपवू शकतो; Anthropic च्या संशोधकाने राजीनामा देत दिला गंभीर इशारा!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT