file photo
file photo 
नांदेड

क्रिडा विश्व : कोहिनुर टेनिस स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पोलिस उपमहानिरीक्षक श्री तांबोळी यांच्या हस्ते सन्मानीत

प्रा. इम्तीयाज खान

नांदेड : नांदेड जिल्हा व शहर लाँन टेनिस असोसिएशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय कोहिनुर चषक स्पर्धेत विशाल साळवी, संजय चादवानी, निळकंठ डामरे, डॉ. अंबुलगेकर यांनी आप- आपल्या गटाचे विजेतेपद पटकाविले, पोलिस  उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम, चषक व प्रशस्तीपत्र देऊन सम्मानित करण्यात आले.

मागील एक दशका पासून अविरत आयोजित स्पर्धा या वर्षी नांदेड क्लब, यशवंत कॉलेज व सीआरपीएफ केंद्र मुदखेड या टेनिस कोर्ट वर ता. सहा ते ता. सात फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  40, 50, व 60 वयो गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. देशभरातील एकूण शंभर नामवंत टेनिस पट्टूनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. या स्पर्धेत स्थानिक खेळाडूंनीही सहभाग नोंदविला.

नांदेड क्लब येथे ता. सात फेब्रुवारी रोजी रात्री या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड परिक्षत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हाधिकारी तथा नांदेड क्लबचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर, सौ. इटनकर आदींची उपस्थिती होती.

स्पर्धेचा निकाल असा 

40 वर्ष खालील गट (एकेरी ) विजेता विशाल साळवी उपविजेता श्रीकांत कुमावत (दोन्ही नाशिक ) दुहेरी  गट. विजेता विक्रांत तांदळे (औरंगाबाद ) व सिद्धांत देशपांडे ( परभणी ) उपविजेता पवन तवानी व पंकज सौदागर (पुसद ) 40 वर्ष वरील गट एकेरी, विजेता संजय चांदवाणी (अमरावती )उप विजेता विकास आस्वानी (अमरावती) दुहेरी गट,, विजेता प्रवीण गाय समुद्रे व विजय मेहर (औरंगाबाद ) उप विजेता, मनीष सूर्यवंशी (परभणी )व जिमी तीमबाडीया  (अमरावती ) 50 वर्षावरील गट, एकेरी. विजेता, नीलकंठ डामरे (मुंबई )उप विजेता, भूषण अकुत(मुंबई ) दुहेरी गट. विजेता, डॉ, तरोडेकर व जो  सेफ. 60वर्ष वरील गट  दुहेरी  विजेता डॉ, तरोडेकर व जोसेफ उप विजेता, अरविंद व सुरेश (तेलंगणा )

नांदेडच्या खेळाडूंनी ही या स्पर्धेत उल्लेखनीय कामगीर केली. यामध्ये हरजिंदर सिंघ चिरागिया व गगन सिंघ चड्डा, अली पंजवानी, मधू गुप्ता यांनी आप आपल्या गटात उपांत्य फेरी पर्यन्त धडक मारली हे विशेष. तसेच युवा खेळाडूत कर्तव्य कारंडे, शरद कानडजे, अमित देशमुख व शिवतेज शिरफ़ुले यांनी ही प्रेक्षकांची मने जिंकली.

याप्रसंगी जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष भगवानराव आलेगोवंकर, सचिव डॉ. शशी गायकवाड, माजीमंत्री माधवराव किन्हाळकर, अजय बिसेन,  स्पर्धा संचालक अली पंजवानी, शंतनू डोईफोडे, नांदेड क्लबचे सचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, सहसचिव हरजिंदरसिंघ चिरागिया, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, मधू गुप्ता, डॉ. विडेकर, डॉ. वामनराव कळमसे, रामदेव दाड, डॉ. दागडीया आदींची उपस्थिती होती.  

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT