नांदेड : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी, कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला राज्य सरकार पाठीशी घालत आहे. अंडरवर्ल्डच्या मदतीने अत्यंत महागडी जमीन कवडीमोल भावाने महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मिळाली. त्यामुळे मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील असलेले आर्थिक व्यवहार पुढे आले आहेत. मलिक यांच्यावर योग्य कारवाई केली असून, राज्य सरकारला महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? असा प्रश्न खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे उपस्थित केला.
त्यांनी पत्रकात नमूद केले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती केंद्रीय तपास यंत्रणेला दिली होती. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. ही अटक नियमानुसारच केली असून, केंद्रीय तपास यंत्रणेवर संशय घेणाऱ्या महाविकास आघाडीतील नेते आणि राज्य सरकार नवाब मलिक यांना पाठीशी घालून कुठला संदेश देऊ पाहत आहेत. राजकारणाचा स्तर अजून किती खालच्या पातळीवर घेऊन जाणार, असा सवाल खासदार चिखलीकर यांनी उपस्थित केला आहे.
देशाचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम रियल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतोय हे व्यवहार मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला आहे. तरीदेखील देशाच्या सुरक्षेच्या बाबतीतसुद्धा काहीजण राजकारण करतात, अशी टीकाही खासदार चिखलीकर यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.