file photo 
नांदेड

अत्यावश्यक साधनांची साठेबाजी, काळाबाजार केल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले आहेत. तसेच फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये नांदेड जिल्ह्यात मनाई आदेश रविवार ता. (ता. तीन मे) मध्यरात्री पासून ते ता. १७ मे रोजीच्य मध्यरात्री पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात संदर्भात नमूद जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या निर्गमीत आदेशातील अटी व शर्ती जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे आदेशही त्यांनी निर्गमित केले आहेत.  

शुद्धीपत्रकानुसार सुधारीत निर्देश
जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे ता. १५, ता. १९ व ता. २१ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात मनाई आदेश ता. तीन मे रोजी मध्यरात्री पर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश, नियमावली आणि उपाययोजनासह लागू करण्यात आले होते. तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे आदेश ता. २० व ता. २३ एप्रिल मध्ये नमूद शुद्धीपत्रकानुसार सुधारीत निर्देश जारी करण्यात आले होते.

लॉकडाऊनचा कालावधी वाढविला 
राज्याचे मुख्य सचिव यांच्या ता. दोन मे रोजीच्या आदेशान्वये राज्य शासनाने रविवार ता. १७ मे पर्यंत अटी व शर्तीच्या अधिन लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. त्यानुसार व फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता १९७९ चे कलम १४४ खालील तरतुदीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रातील जनतेस, नमूद व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून जमावबंदी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने सदर आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.

आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुध्द कारवाई
या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकारी यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोणातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.

साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कारवाई 
सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचे कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. असे आदेश रविवारी (ता. तीन) जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्गमित केले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मारनच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Kalyan Dombivli Elections: कल्याण डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत; महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

SCROLL FOR NEXT