file photo 
नांदेड

निवासी डॉक्टरांवर कोविडसह शैक्षणिक नुकसानीचा ताण; विशेष विषयाचे ज्ञान कसे मिळणार?

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर व जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढली आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालय व महाविद्यालयातील जवळपास सर्वच खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित केल्याचे चित्र आहे. त्यात शस्त्रक्रिया आणि इतर साधारण संदर्भातील रुग्ण घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. उपस्थित निवासी डॉक्टरांना कोविड केअर सेंटरमध्ये ड्युटी लावली जात असल्याने त्यांचा ताण वाढत आहे. तर होणारे शैक्षणिक नुकसान कसे भरुन काढणार असा प्रश्न त्यांना पडला आहे.

मागील वर्षभरापासून कोविडचा प्रसार वाढला आहे. त्यात मार्च 2020 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने नांदेडमधील नव्हे तर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्राणाची बाजी लावत कोरोना रुग्णावर उपचार केले. त्यांच्या या कार्याचे राज्य शासनानेही कौतुकही केले. परंतु कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याने पुन्हा पुढच्या वार्डात ड्युटी करण्याची जबाबदारी निवासी डॉक्टरांवर येऊन पडली आहे. कोरोना काळात ड्युटी करण्यास निवासी डॉक्टरांनी विरोध केला नाही. परंतु त्यांच्या विशेष विषयांचा अभ्यासक्रम शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक सराव अधिक बाबींचा अभ्यास कधी करणार असा प्रश्न निवासी डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. 

कोरोना २०२१ च्या मार्चमध्ये पुन्हा झपाट्याने वाढत आहे. परिणामी मागील वर्ष पूर्ण कोरोनामध्ये गेले आणि यापुढेही असेच राहिले तर शैक्षणिक नुकसान कसे भरुन काढणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये १७८ निवासी डॉक्टर आहेत. त्यापैकी जवळपास ४० ते ५० डॉक्टरांना आठवड्यात पोलिस ड्युटी असते. त्यात क्वारंनटाईन पद्धत बंद केल्याने संबंधित डॉक्टरांकडून सेवा इतर वार्डातही दिली जात आहे. परिणामी इतर आजारांचे रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजपर्यंत नांदेडच्या साठहून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोना होऊन गेला आहे, तर काही जण सध्या पॉझिटिव्ह आहेत. काही जणांना तर दुसऱ्यांदा संसर्ग झाला. या परिस्थितीतही राज्यातील सर्वच जीएमसीचे निवासी डॉक्टर रुग्ण सेवा देण्यास तयार आहेत. परंतु त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. पदवीत्तरचे शिक्षण तीन वर्षाचे असते. २०२० जवळपास कोरोना रुग्णांमध्ये गेले आणि पुन्हा २०२१ जात आहे. त्यामुळे एका वर्षात विशेष विषयाचा अभ्यास कसा करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रणव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शैक्षणिक वर्षात तीन वर्षात पैकी दोन वर्षे कोरोनाचे रुग्णांवर उपचार करण्यात गेले तर विशेष विषयाचा अभ्यास कधी करायचा. जवळपास दोन वर्षापासून विद्यार्थी त्यांच्या विशेष विषयाचे अभ्यासापासून दूर गेले आहेत. त्यामुळे आमचे करिअर धोक्यात आले आहे. सुरुवातीला कोविड काळात रात्रंदिवस कोरोना रुग्णांची सेवा सुरु आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : फलटणमध्ये विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

SCROLL FOR NEXT