नांदेड : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समिती व आयटक या संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारपासून (ता. २५) आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या काम बंद आंदोलनाला कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हे २००५ पासून कार्यरत आहे. त्यामध्ये कंत्राटी अधिकारी, कर्मचारी तेव्हापासून आजपर्यंत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असून त्या अधिकारी व कर्मचारी यांना कायमस्वरूपी शासन सेवेमध्ये तत्काळ समायोजन करावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनास आयटक, आरोग्य खाते नर्सेस युनियनमार्फत त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समिती, जिल्हा कर्मचारी कामगार संघटना, बहुजन रयत परिषद यांनी पाठिंबा देऊन या मागण्यांचे समर्थन केले आहे.
या प्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ॲड. प्रदीप नागापूरकर, शिवाजी फुलवळे, कर्मचारी समायोजन कृतीचे समन्वयक रेखा टरके, श्री. देशमुख, आरोग्य सेविका सपना टोमके, ज्योती वाघमारे, सपना झंपलवाड, शुभांगी मठपती, मीरा यांच्यासह अधिपरिचारिका, तांत्रिक, अतांत्रिक, एनएचएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायम केले जावे तसेच गेल्या १५ ते २० वर्षापासून हे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर काम करीत असून त्यांना समायोजन करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा. शासन जर वेळकाढूपणा करीत असेल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.
- प्रा. इरवंत सूर्यकार, सदस्य, कष्टकरी कामगार कर्मचारी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.