नांदेड जिल्हा परिषद 
नांदेड

विद्यार्थ्यांना झेडपीच्या वतीने स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करुन द्याव्यात- रवी ढगे

मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच वर्ग पहिलीला असलेली मुले शाळेत न येताच दुसरीमध्ये शिक्षणाच्या अधिकार अधिनियमामुळे गेले असे इतर वर्गांच्या बाबतीतसुद्धा झाले आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा परिषद येथील सर्व शिक्षक संघटनेच्या बैठकीचे कोरोनाचा काळात विद्यार्थी शिक्षण समस्या परिस्थिती, शिक्षकांच्या प्रलंबित विविध मागण्या याबाबत आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, प्राथमिकचे प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षण अधिकारी दिलीपकुमार बनसोडे, दतात्र्य मठपती, बंडू आमदूरकर, अधीक्षक श्री. येरपूरवार सर्व विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होते.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीपासून शाळा पूर्णपणे सुरु होऊ शकल्या नाही. शाळा बंद पण शिक्षण सुरु या अनुषंगाने विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मार्गाने (व्हाट्सअ‍ॅपच्या ग्रुप, गुगल मिट, अभ्यास मित्र, वर्चुअल क्लासरुम) मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे काम शिक्षकांनी केलेले आहे. परंतु ग्रामीण भागाची परिस्थिती पाहता ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना देणे शक्य होत नाही. कारण काही पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. असले तरी त्यांना तो मुलांना देणे त्यांच्या कामामुळे देता येत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच वर्ग पहिलीला असलेली मुले शाळेत न येताच दुसरीमध्ये शिक्षणाच्या अधिकार अधिनियमामुळे गेले असे इतर वर्गांच्या बाबतीतसुद्धा झाले आहे.

हेही वाचा - योगासने व्‍यायाम म्हणून नाही करायची..; काय आहे योगा जाणून घ्या

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून उपक्रमशील टेक्नोटीचर विषयतज्ज्ञ आदी शिक्षकांचा एक अभ्यास गट तयार करुन वर्ग पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्व वर्ग तयारी असलेला किमान मूलभूत क्षमता असलेला अभ्यासक्रम ऑफलाईनच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्वाध्याय पुस्तिका तत्काळ उपलब्ध करुन दिल्यास विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान काही अंशी टाळता येईल. तसेच कोरोनाची तिसरी लाट काही आठवड्यात येण्याची शक्यता टास्क फोर्स यांनी वर्तवली असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा पूर्ववत सुरु करु नये, या मागण्या शिक्षक सहकार संघटनेचे राज्य संघटक रवी ढगे यांनी केले आहे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी लवकर एक बैठक जिल्हा प्रशिक्षण संस्था येथे घेऊन पुढील नियोजन करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शिक्षक सहकार संघटना जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, सचिव सचिन भालेराव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT