Tamsa Bhokar road construction Inspection by Forest Department and PWD officials
Tamsa Bhokar road construction Inspection by Forest Department and PWD officials sakal
नांदेड

नांदेड : जंगल क्षेत्रातील राज्य रस्त्यासाठी हालचाली

सकाळ वृत्तसेवा

तामसा : तामसा ते भोकर या राज्य महामार्गातील जंगल क्षेत्रातील रस्ते काम तीन जागी वनविभागाने आक्षेप घेतल्यानंतर थांबले असून सोमवारी वनविभागाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी रस्त्यातील आक्षेपाच्या तिन्ही ठिकाणची पाहणी करून उचित कारवाईसाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठवल्यामुळे या रस्ते विकासाचा मार्ग मोकळा होण्याच्या हालचाली वाढून आशा पल्लवित झाली आहे. ‘दैनिक सकाळ’च्या मे च्या अंकात रस्त्यातील जंगल क्षेत्राच्या अडचणीवर प्रकाश टाकून दोन्ही विभागाचा पेच निकाली काढण्याबाबत दाखवण्यात येत असलेल्या उदासीनतेबद्दल टीका करण्यात आली होती.

स्त्यातील शिवपुरी व घोगरी शिवारात वन विभागाचे जंगल क्षेत्र असल्याने रस्ता रुंदीकरण व विकासाला अक्षेप घेऊन काम थांबविण्यात आले आहे. शिवपुरी शिवारात पाचशे मीटर तर घोगरी शिवारात साडे चौदाशे मीटर रस्त्याचे काम थांबले असून तामसा ते भोकर उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण व पुलाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी दोन्ही विभागाच्या वरिष्ठांनी या महत्त्वाच्या रस्ते वाहतुकीच्या प्रश्नाला निकाली काढण्यासाठी जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नांदेड येथील उपवनसंरक्षक केशव वाबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भिसे, भोकरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिक मोडवान, कनिष्ठ अभियंता अमोल राठोड, तामसा वनपरिमंडळ अधिकारी मनोज गुरसाळी, मांडवाचे वनपाल अमोल जिंकरवाड, वनरक्षक उद्धव वर्तळे, हनुमंत धुळगंडे, सर्वेअर राठोड यांनी दोन्ही ठिकाणी जाऊन पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT