File photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात कॅफेच्या नावावर चालतंय बरंच काही 

प्रमोद चौधरी

नांदेड : महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये कॅफेची मोठी क्रेझ आहे. घरातून महाविद्यालय किंवा खासगी शिकवणीला जाते म्हणून तरुण मुले-मुली तासनतास या कॅफेमध्ये बसून असतात. अनेक कॅफे चालकांकडून पैशांच्या हव्यासापोटी प्रेमीयुगुलांना सुविधा उपलब्ध करून देवून एक तासाला तब्बल २०० ते ३०० रुपये उकळण्याचे काम केल्या जात आहे. 

शहरात महाविद्यालयीन परिसरासह अनेक ठिकाणी कॅफे उघडण्यात आले आहेत. शहरा-शहरांमध्ये कॅफे सेंटर सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी या कॅफेमध्ये बसून अश्लील चाळे करीत असल्याचे प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले आहे. उघडकीस येत आहेत. मंद प्रकाश असलेल्या या कॅफेमध्ये कॅबिनचीही व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

अनेक कॅफेमध्ये कॉफी, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थांच्या नावाखाली कॅफे चालविल्या जात असून प्रत्यक्षात मात्र या कॅफेची पाहणी केली असता अनेक कॅफेमध्ये किचन बंद असून साहित्य धुळखात पडलेले दिसून आले. कित्येक महिन्यांपासून या ठिकाणी कॉफी किंवा अन्य कोणतेही पदार्थ बनविण्यात आलेले नसल्याने याठिकाणी अवैध प्रकाराला प्रौत्साहन देण्यासाठीच हे कॅफे सुरु करण्यात आल्याचे यावरून दिसून आल्याचेही श्री. सोनवणे यांनी सांगितले. 


  
कॅफेचे फुटले पेव 
शहरामध्ये कॅफेचे पेव फुटले आहे. अनेक प्रेमी युगुल या कॅफेमध्ये तासनतास बसून अश्लील चाळे करत आहेत. त्यामुळेच या कॅफेमध्ये तरुण-तरुणींची मोठी गर्दी पहावयात मिळत आहे. अनेक तरुणी तर मैत्रीनीचा वाढदिवस आहे, सेलीब्रेशन करीता जात असल्याचे सांगून घरून निघून जातात. मात्र, वाढदिवस हा घरी साजरा न होता कॅफेमध्ये स्पेशल बर्थडे हॉल म्हणून तयार केलेल्या कॅबीनमध्ये साजरा केला जातो. 

पालकांनी जागरुक व्हावे 
कोमलत्या वयात तरुण तरुणी बेधूंद होतात. कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या अशा अश्लील प्रकारांना नवीन वर्षात आळा घालण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली असून हे पथक पुन्हा सक्रीय करून अशा अश्लील प्रकार थांबविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- तुळशीराम सोनवणे (ज्येष्ठ नागरिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT