फोटो 
नांदेड

तराफे विरुद्ध बोटी सामना रंगणार... काय आहे प्रकार वाचा...?

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पवित्र गोदावरी नदीला विद्रुप करुन वाळू माफियांनी वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. कारवाया झाल्यानंतरही वाळू माफियां खचुन न जाता पुन्हा वाळू उपसा करत आहेत. आता यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदी पात्रात बोटीद्वारे टेहळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बोटीतील कर्मचाऱ्यांनी खात्याशी प्रामाणीकपणा दाखविला तरच वाळू माफियांवर अंकुश घालता येणार आहे. एकीकडे वाळू माफियांचे तराफे तर दुसरीकडे प्रशासनाच्या बोटी असा सामना रंगणार आसल्याचे दिसून येणार आहे. 

वाळूचा अवैध उपसा थांबला नसल्याने वाळू माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी महसूल प्रशासनाने आता बोटीद्वारे गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. बोटीविरुद्ध तराफे असा सामना येत्या काळात राहणार असल्याचे दिसत आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगवेगळी पावले उचलली जात असली तरी त्याचे व्यापक परिणाम अजून दिसून येत नाहीत. यामुळे अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण वाढले खरे, परंतु खाली अवैध वाळू उपस्याचे पाळेमुळे खोलवर रुजलेली असल्याने कारवाईनंतर पुन्हा वाळू काढण्यासाठी ही मंडळी पुढे येत आहे. तराफे, बोटी ब्लास्टींग करुन उडविली आणि वाळू माफियांचे नुकसान होत असले तरी पुन्हा वाळू उपसा सुरूच आहे. 

चोर- पोलिस या खेळाप्रमाणे

जिल्ह्यातील सुरू असलेला अवैध वाळू उपसा कोणीच थांबू शकत नाही, असे चित्र सध्या निर्माण केले आहे. अवैध उपसा सुरू ठेवत महसूल प्रशासनाला आव्हान दिले जात आहे. चोर- पोलिस या खेळाप्रमाणे वाळूचा अवैध उपसा करणारी मंडळी पुढे महसूलचे अधिकारी त्यांच्या पाठीमागे अशीच काही परिस्थिती आहे. नांदेड तालुक्यातील महसूल प्रशासन याला कारणीभूत असले तरी चोरांना मिळणारी राजकीय संरक्षण हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले पण तक्रारींचा पाढा सुरु राहत असल्याने महसूल प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या पडू लागल्या आहेत.

नदीपात्रातून गस्त घालण्याचा नवा पायंडा 

नदीपात्रातील तराफे जाळून आणि बोटीने जिलेटिनच्या साह्याने ब्लास्ट करून नष्ट केल्यानंतरही वाळू उपश्‍याचे प्रमाण सुरू असल्याने महसूल प्रशासनाकडून वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता थेट नदीपात्रातून गस्त घालण्याचा नवा पायंडा सुरू करण्यात आला आहे. नदीत बोट उतरण्याची चांगली शक्कल जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्षात उतरली असती तरी या बोटीत बसलेल्या कर्मचाऱ्यांनीच मात्र वाळू माफियांना मदत केली तर पथकाच्या हाती काहीच लागणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT