Ambernath: काय हा निर्लज्जपणा! भ्रष्टाचार करा पण अति नको; उपनगराध्यक्षाचं सभागृहातच विधान, नगरसेवक दात काढून हसले

Sadashiv Patil controversial statement : अंबरनाथ उपनगराध्यक्षांनी भ्रष्टाचाराबाबत गंभीर वक्तव्य केले आहे. "चोरी करा, भ्रष्टाचार करा, पण लिमिटमध्ये'' या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Sadashiv Patil On corruption

Sadashiv Patil On corruption

ESakal

Updated on

अंबरनाथ : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शहरातील विकासकामांमधील कथित भ्रष्टाचार आणि बोगस बिलांवरील चर्चेदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून "चोरी करा, भ्रष्टाचार करा, पण लिमिटमध्ये करा. परसेंटेज कमी असायला पाहिजे," असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. यावरून सर्व स्तरांतून तीव्र टीका होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com