नैसर्गीक वीज
नैसर्गीक वीज 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात वीज पडून तिघांचा मृत्यू; १३ जनावरेही दगावली

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मागील काही दिवसापासून तडाखा दिला आहे. यादरम्यान (Nanded) वीज पडून तिघांना जीव गमवावा (Three dead in lightining) लागला तर चौघे जखमी झाले आहेत. तसेच लहान- मोठी १३ जनावरेही दगावली आहेत. उन्हाळी पिके, फळपिक व भाजीपाला नुकसानीबाबत (vigetable loss) माहिती मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. Three killed in Nanded district in two days; 13 animals were also killed

नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पूर्व मोसमी पावसाने तडाखा दिला आहे. यात वादळी वारे, गारपीट तसेच पावसाने झोडपून काढल्याने शेतीपिकासह भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी हळद शिजवून वाळवणीसाठी घातली होती, त्यावर पाणी पडल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली. दरम्यान नांदेड जिल्ह्यात मार्च, एप्रीलनंतर मे महिन्यातही पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट तसेच वीज पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

हेही वाचा - कामे वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करा; अन्यथा काळ्या यादीत टाकू- अशोक चव्हाण

यात मुखेड तालुक्यातील तुपदाळ खु. येथील रमेश पंढरीनाथ दोमाटे (वय ५५) तसेच नंदगाव ता. किनवट येथील विश्वनाथ नंदकुमार तरटे (वय २०) यांचा शुक्रवारी (ता. सात) तर मुखदेड तालुक्यातील मुगट येथील लक्ष्मीबाइ बालाजी वर्षेवार (वय २८) या महिलेचा रविवारी (ता. नऊ) वीज पडून मृत्यू झाला. वीज पडून जखमी झालेल्यात मुगट (ता. मुदखेड) येथील रेणुका व्यंकटी वर्षेवार (वय ३), इंदूबाइ बाबुराव लोंखडे (वय ५५), अर्चना दिलीप मुंडकर (वय २२) व डोंगरगाव ता. लोहा येथील विष्णू उत्तम राठोड यांचा समावेश आहे. मयत तसेच जखमी नागरिकांच्या कुटूंबातील व्यक्तींना तातडीने मदत देण्यात येणार आहे.

१३ जनावरे दगावली

वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचेही नुकसान झाले आहे. यात वीज पडून जिल्ह्यातील लहान- मोठी १३ जनावरे मृत्यूमुखी पडली. यात गाय एक, सात म्हैस, दोन वासरु, तीन बैलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षातून मिळाली. पुशपालकांना जिल्हा प्रशासनाकडून मदत देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT