नांदेड ः महापालिकेच्या पथकाने बुधवारी १३ दुकाने सील केली.  
नांदेड

Video - नांदेडकरांनो सावधान; घराबाहेर पडताना घ्या काळजी....

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड महापालिकेच्या वतीने पथकांची स्थापना करण्यात आली असून, बुधवारी (ता.आठ) पथकाने शारीरिक अंतराचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावणे या व इतर कारणांसाठी कारवाई केली. दिवसभरात १३ दुकाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर तोंडाला मास्क लावले नसल्याने नागरिकांकडून ३१ हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी कोरोना ब्रेक द चेन ही नियमावली लागू केली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार बुधवारी पथकाच्या वतीने कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या पथकाने केली कारवाई
वजिराबाद, चिखलवाडी कॉर्नर, जुना मोंढा आदी भागांत पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या पथकात उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शुभम क्यातमवार, सुधीर इंगोले, विलास भोसीकर, सहायक आयुक्त प्रकाश गच्चे, राजेश चव्हाण, डॉ.मिर्झा फरतुल्ला बेग, अविनाश अटकोरे, अग्निशमन अधिकारी रईस पाशा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. 

१३ दुकानांना केले सील
बुधवारी दिवसभरात सागर मोबाईल, विनायक टेलिकॉम, हरिओम मोबाईल, मारोती मोबाईल (सर्व चिखलवाडी कॉर्नर), श्री टेड्रर्स, इलियाज कंपनी, पांडुरंग कंपनी, रहेमान कंपनी, कोमल कंपनी (सर्व जुना मोंढा), बॉम्बे वॉच डेपो (हनुमान टेकडी), बॉम्बे लेडीज कलेक्शन (वजिराबाद), रिलायन्स डिजिटल मार्ट, मणियार हॉटेल (शिवाजीनगर) या तेरा दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली. यापुढेही महापालिकेच्या पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिली. 

तोंडाला मास्क नसल्याने दंड
तोंडाला मास्क लावले नसल्याने नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला. तरोडा सांगवी क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने ५४ जणांकडून सात हजार शंभर रुपये, अशोकनगरच्या पथकाने ३५ जणांकडून पाच हजार शंभर रुपये, शिवाजीनगरने ५५ व्यक्तींकडून साडेपाच हजार रुपये, सिडकोच्या पथकाने १०७ जणांकडून १३ हजार नऊशे असे २५१ जणांकडून ३१ हजार नऊशे रुपये दंड वसूल करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT