traffic
traffic 
नांदेड

Video ; वाहतूक कोंडीने वाढविली पुन्हा डोकेदुखी 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः कोरोनाच्या वाढत्या संख्येने दिवसेंदिवस नांदेडकरांची चिंता वाढत आहे. या चिंतेत आणखी भर पडली आहे ती नागरिकांच्या बाजारपेठेतील वर्दळीने. शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळपासून खरेदीसह विविध कामानिमित्त दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन नागरिक मोठ्या प्रमाणात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कोंडी शहरवासीयांसाठी तसेच शहर वाहतूक पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे. 

शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वच शासकीय कार्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठाणे सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत खुली राहात आहेत. अनेक नियम पाळून नागरिकांना बाजारपेठेत येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, नियमांना बगल देत अनेकजण बाजारात फिरत असल्याचे दिसून येते. याचा परिणाम वाहतुकीच्या कोंडीवरही होत आहे. 

मुख्य चौकात उडतेय झुंबड 
शहरातील अनेक भागात शहर वाहतूक शाखेसह महापालिकेने सम-विषम पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी होऊ नये, याकरिता काही जागा राखीव ठेवल्या आहेत. तरीही वाहनधारक दिसेल त्या जागेवर आणि गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणी आपली चारचाकी वाहने लावून ही कोंडी वाढवत आहेत. 

पोलिस असूनही उपयोग होईना...
काही रस्ते आधीच अरुंद, त्यात वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीने वाहतुकीची कोंडी जागोजागी होत आहे. यामुळे मुख्य चौकात पोलिसांची ड्युटी लावूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येते. पोलिस आपले कर्तव्य बजावत असले तरी वाहनधारक दुकानांसमोर मिळेल त्या जागेवर वाहने उभी करत आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस बाजारपेठेतही गस्त घालून वाहनधारकांना गर्दी न करण्याचे आवाहन करत आहेत. तरी ही समस्या सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 

पोलिसांचे वाहनधारकांना आवाहन 
शहरात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शक्यतो काम असेल तरच बाजारपेठेत फिरण्याचे आवाहन केले जात आहे. शहरातील श्रीनगर, शिवाजीनगर, वजिराबाद, शिवाजी चौक, महात्मा गांधी पुतळा परिसर, जुना मोंढा, डॉक्टर लेन, गुरुद्वारा रोड यासह जिल्हाकचेरी रस्ता, तहसील कार्यालय परिसर आदी ठिकाणी शक्यतो वाहनधारकांनी दुचाकी वाहनांचा वापर करावा. गजबजलेल्या ठिकाणी चारचाकी वाहने नेऊ नयेत. यामुळे काही प्रमाणात का होईना शहरातील वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत होईल.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT