file photo
file photo 
नांदेड

नांदेडच्या भनगीमध्ये तुंबळ हाणामारी- २६ जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादातून चक्क एकमोकावर प्रणघातक हल्ला करण्यात आला. यात अनेक जण गंभीर जखमी झाले. लोखंडी रॉड, काठी आणि दगडांचा सर्रास वापर करण्यात आला. सर्व जखमीवर विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा प्रकार भनगी (ता. नांदेड) येथे रविवारी (ता. १७) सकाळी साडेअकरा वाजता घडला. या प्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध २६ जणांवर विविध कलमान्वये रात्री साडेअकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

भनगी (ता. नांदेड) येथील ज्ञानोबा गच्चे यांचा लहान मुलगा खेळत असताना दिलीप गच्चे याच्या मुलाने भांडण केले. लहान मुलाचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ज्ञानोबा धोंडिबा गच्चे यांना त्यांच्या भावकीतील दिलीप रमेश गच्चे, चंद्रकांत रमेश गच्चे, तानाजी दगडू गच्चे यांनी ज्ञानोबा गच्चे आणि सुनील गच्चे यांना मारहाण केली. यानंतर गावात तणाव निर्माण झाला. 

यात अनेक जणांचे डोके फुटले

या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोन्हीकडील भावकीतील काही जण समोरसमोर आले. एकमेकात चांगलाच वाद झाला. यानंतर एकमेकांनी चक्क लोखंडी रॉड, काठी, गजाळी व दगडांचा सर्रास वापर करुन तुफआन हाणामारी झाली. यात अनेक जणांचे डोके फुटले. काही सुज्ञ नागरिकांनी मध्ये पडून फिल्मीस्टाईल हाणामारी थांबविली. यानंतर जखमी झालेल्यांना नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. 

अतिदक्षता विभागात उपचार

घटनेची माहिती नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात समजताच पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी घटनास्थळ गाठले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांना सांगितले. माहिती समजताच श्री. पाटील आपल्या पथकासह भनगी येथे दाखल झाले. त्यानंतर शासकिय रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. किरकोळ कारणावरून झालेला वाद हा अनेकांच्या जीवावर बेतला होता. यात काही तीन ते चार जण वृद्ध गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आला. 

२६ आरोपीपैकी १२ जणांना अटक

ज्ञानोबा गच्चे, पंडीत गच्चे आणि हिरामन गच्चे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला, दंगल यासह विविध कलमान्वये २६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस निरिक्षक प्रशांत देशपांडे यांनी रात्रभरातून तब्बल १२ जणांना अटक केली. या सर्वांना घेऊन ते स्वत: आपल्या सहाकाऱ्यांसह नांदेड न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने या सर्वांना पोलिस कोठडीत पाठविले आहे. या हाणामारीनंतर भनगी गावात दहशतीचे वातावरण पसरले होते.
 
तिन्ही गुन्ह्यात हे आहेत आरोपी

दिलीप रमेश गच्चे, चंद्रकांत रमेश गच्चे, अरूण दगडु गच्चे, तानाजी दगडु गच्चे, ज्ञानोबा धोंडिबा गच्चे, सटवा धोंडीबा गच्चे, एकनाथ धोंडीबा गच्चे, हिरामन धोंडीबा गच्चे,  सिद्धार्थ धोंडीबा गच्चे, सचीन ज्ञानोबा गच्चे, अनिल सटवाजी गच्चे, प्रविण ज्ञानोबा गच्चे, अनिल सटवाजी गच्चे, साहेब अर्जून गच्चे, कपी अर्जून गच्चे, सुनिल यशंवत गच्चे, विशाल हिरामन गच्चे, रमेश दगडू गच्चे, तानाजी दगडू गच्चे, दिलीप दगडू गच्चे, अरूण दगडू गच्चे, पंडीत दगडू गच्चे, राहूल दगडू गच्चे, चंद्रकांत रमेश गच्चे,  रेखा रमेश गच्चे, अश्‍विनी पंडीत गच्चे आणि वर्षा दिलीप गच्चे यांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT