file photo 
नांदेड

आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करु; नांदेडकरांनो गतवर्षीसारखे सहकार्य द्या- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी खांद्याला- खांदा लावून प्रयत्नांची शर्त करीत आहेत. गतवर्षी कोरोनाचे आव्हान नवीन असूनही नागरिकांच्या सहकार्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव आपण लवकर आटोक्यात आणू शकलो. यावर्षीही चाचण्यांचे प्रमाण आपण खुप मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. तात्काळ निदान आणि लवकर उपचार यावर आपण भर देत आहोत. असंख्य आव्हाने असूनही आजवर नागरिकांचे सहकार्य निर्विवाद राहिले आहे. आणखी आपला सर्वांना एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेत आपले कर्तव्य पार पाडावयाचे आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आम्ही सर्व प्रयत्नांची शर्त करीत असून नांदेड जिल्हा वासियांनो गतवर्षीसारखेच आपले सहकार्य द्या या शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना साद घातली आहे. 

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, फारच गरज असेल तर योग्य मास्क घालून जे काम आहेत ते तात्काळ उरकून घरी परतणे, बाहेर सॅनिटायझरचा वापर करणे, घरी व वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ करणे हे सुत्र पाळलेच पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
या आठवड्यात नांदेडच्या वैद्यकीय सुविधेत दोनशे खाटांच्या जंबो कोविड सेंटरची भर
▪️युध्द पातळीवर काम पूर्णत्वाकडे
▪️ऑक्सिजन व व्हेंटेलिटरची सुविधा

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनाने वाढविले असून वेळेच्या आत निदान आणि तात्काळ उपचार सुरु करण्यावर आरोग्य विभागाने भर दिलेला आहे. प्रकृती खालावेपर्यंत रुग्णांनी वाट न पाहता त्वरीत तपासणीनंतर उपचारावर भर हे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी कोविड संसंर्गाकडे दुर्लक्ष केले आहे अशा व्यक्तींची प्रकृती अतिगंभीर झालेली निदर्शास येत आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवा सुविधांमध्ये अधिक भर पडावी या उद्देशाने नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथे जंबो कोविड हॉस्पिटल पूर्णत्वास आले असून येत्या चार ते पाच दिवसात ते अतिगंभीर रुग्णांच्या उपचारासाठी सुरु होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शर्थीचे प्रयत्न केले जात असून आवश्यकता नसताना जनतेने घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT