file photo 
नांदेड

पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे कार्य व विचार सर्वांनाच प्रेरणा देणारे- गुणवंत मिसलवाड

प्रल्हाद कांबळे

नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तथा भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे कार्य व विचार युवा पिढीसहीत सर्वांनाच प्रेरणा देणारे आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन पुरस्कार पुरस्कृत तथा सामाजिक कार्यकर्ते गुणवंत मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगारात पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बोलत होते. एस.टी. डेपो नांदेड आगाराच्यावतीने कोविड-१९ चे शासन नियम पाळून जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.


पुढे बोलताना ते म्हणाले की, वयाच्या १५ व्या वर्षापासून राष्ट्रपिता म. गांधी यांच्या विचारावर प्रभावित होऊन भारत स्वातंत्र्याच्या अनेक आंदोलन, चळवळीत मोलाचे योगदान दिले असून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचा व विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला बसस्थानकप्रमुख वर्षा येरेकर, चार्जमन श्रीनिवास रेणके, वाहतुक उपनिरीक्षक सुधाकर घुमे, आनंद कदम कोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शेवटी अध्यक्षीय समारोप पुरुषोत्तम व्यवहारे यांनी केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन राजेश गहीरवार यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री विजय गायकवाड, विनोद हतागळे, मंगेश झाडे, बाबुराव तर्फेवाड, भगतसिंघ सिद्धू, विजय खेडवनकर, राऊतखेडे, संजय खेडकर, रवी जायभाये, बसवेश्‍वर होनराव, चंद्रकांत वाघमारे, राजेश कांबळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil statement : गोकुळचं राजकारण! सतेज पाटलांनी महाडिक काका पुतण्यांचा घेतला समाचार; ‘भावकीनं लक्षात ठेवावं’

Gulabo-Sitabo: देवरानी-जेठानीचे भांडण अन् १८५७ च्या क्रांतीत देशप्रेमाची ठिणगी! गुलाबो-सिताबो पपेट शोचे काय आहे बच्चन कनेक्शन?

हिऱ्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो, आठवड्याला १०-१२ कोटी उडवतो; ललित मोदींनी सांगितलं एवढा पैसा येतो कुठून?

Ironing Safety Tips : ऐकून हैराण व्हाल, पण कपडे इस्त्री करताना होऊ शकतो ब्लास्ट; त्यामुळं अजिबात करू नका 'या' 4 चुका

Veer Savarkar : सावरकरांनी दिलेला दुधाचा पेला आजही स्मरणात; 90 वर्षांच्या उषाताईंनी जागवली स्वातंत्र्यवीरांच्या भेटीची 'ती' दुर्मिळ आठवण

SCROLL FOR NEXT